• Sun. Jun 7th, 2026
    Accident News : भावाच्या उत्तरकार्याला निघाले, वाटेतच मृत्यूने गाठले, पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा करुण अंत; १५ दिवसांनी लेकाचं लग्न

    Shrivardhan Accident News One Dead : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात एक भीषण अपघात झाला, या अपघातात एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे.

    आरावी अपघात पत्नीसमोर पतीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : उत्तर कार्यासाठी गावी निघालेल्या दाम्पत्यावर काळाने झडप घालत, आनंदाच्या क्षणाआधीच दुःखाची छाया पसरवणारी हृदयद्रावक घटना म्हसळा तालुक्यात घडली. जांभूळ गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात पतीचा पत्नीच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी होऊन जीवनाशी झुंज देत आहे.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथील नरेश जनार्दन पाटील हे आपल्या पत्नी राजेश्री पाटील यांच्यासह श्रीवर्धन तालुक्यातील आरावी गावाकडे भावाच्या उत्तर कार्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. म्हसळा शहराजवळील जांभूळ गावाच्या हद्दीत आल्यानंतर अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले. वेगात असलेलं वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडावर जोरदार आदळलं.
    Maharashtra TimesJalgaon Crime : काम आवरुन खोलीत झोपला, आईने उठवण्यासाठी दरवाजा ठोठावला; खिडकीतून बघताच माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली

    १५ दिवसांनी लेकाचं लग्न

    अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की नरेश पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नी राजेश्री पाटील या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक असल्याची माहिती देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पाटील कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना हा अपघात घडला. नरेश पाटील यांच्या मुलाचं लग्न येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू असतानाच अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षणात संसार उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त होत असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    परिसरात एकच हळहळ

    या घटनेमुळे म्हसळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अचानक नियंत्रण सुटणे आणि रस्त्यालगत असलेली झाडे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
    Maharashtra TimesDharashiv Crime : जमिनीचा व्यवहार, चुलत्याचं डोकं तापलं; झोपलेल्या तरण्या पुतण्यावर तुटून पडला, गंभीर जखमी झालेल्या सुजितनं प्राण सोडला

    माजी नगरसेवकाचा मुलगा हवेत उडून फेकला गेला

    कोल्हापुरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात उपचार सुरू असताना एका माजी नगरसेवक पुत्राचा मृत्यू झाला आहे. मेरी वेदर मैदानाजवळ वळणावर हा भीषण अपघात झाला होता. या ठिकाणी मोपेडवरून रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला कसबा बावड्याहून भरधाव वेगाने आलेल्या स्पोर्टस बाईकने धडक दिली होती. या अपघातात माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांचा मुलगा गौतम राजाराम गायकवाड (40, रा. रमणमळा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा