• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai Local: ठाणे रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू; पत्नीला लेडीज डब्यात बसवलं अन् लोकल पकडताना तेजससोबत धक्कादायक घटना

    Mumbai Local: ठाणे रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू; पत्नीला लेडीज डब्यात बसवलं अन् लोकल पकडताना तेजससोबत धक्कादायक घटना

    Thane railway station: तेजसच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच रामेश्वरसह गिर्ये, विजयदुर्ग परिसरात शोककळा पसरली.

    ठाणे रेल्वेतील गर्दी कोकणातील युवकाच्या जीवावर बेतली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग: रेल्वे प्रवास करताना काळजी घ्यावी न घेतल्यास अपघाताचे गंभीर प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. असाच एक दुर्दैवी अपघात ठाणे रेल्वे स्थानकावर लोकलमधून पडल्याने झाला असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. तेजस उदय पवार (३०, सध्या रा. दिवा मुंबई) असं या युवकाचं नाव आहे. पत्नीला महिलांच्या सुरक्षित डब्यात बसवले आणि स्वतः दुसऱ्या डब्यात जात असताना गर्दी वाढली आणि तेजस बाहेर फेकला गेला. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या तेजस याचा मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तेजस हा मूळचा देवगड येथील असून त्याच्या काकांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. दिवंगत काकांच्या दिवसकार्याला जात असताना तेजससोबत लोकलमध्ये विपरीत घटना घडली. गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्टेशन येथील अपघातात तेजनसे प्राण गमावले. रामेश्वर येथील जि. प. च्या माजी सदस्या वर्षा पवार यांचा तो मुलगा आहे.

    तेजस हा मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होता. दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. तो सध्या दिवा येथे पत्नीसमवेत स्वमालकीच्या घरात वास्तव्यास होता. दरम्यान, नालासोपारा येथे वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या काकांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या दिवसकार्याला जाण्यासाठी तेजस हा पत्नीसमवेत गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पत्नीला लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरित्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. स्टेशनवरून लोकल मार्गस्थ होत असतानाच डब्यात अचानक गर्दी वाढली. या गर्दीचा धक्का बसून तो लोकलच्या डब्यातून बाहेर फेकला गेला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

    दरम्यान, तेजसच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी असा परिवार आहे. तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा मित्र परिवारही मोठा होता. देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार उदय पवार यांचा तो पुत्र होता. या घटनेने देवगड परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाणे परिसरात रेल्वे स्थानकांवर सुटणाऱ्या गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी यावर सुरक्षा दलांनी काही विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा