Accident News: याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या पालकांवरही गुन्हा दाखल होणार असल्याचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिस तपास सुरू आहे.
भरधाव स्पोर्टस बाईकची धडक, माजी नगरसेवकाचा मुलगा हवेत उडून फेकला गेला; उपचारादरम्यान सोडले प्राण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर: कोल्हापुरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात उपचार सुरू असताना एका माजी नगरसेवक पुत्राचा मृत्यू झाला आहे. मेरी वेदर मैदानाजवळ वळणावर हा भीषण अपघात झाला होता. या ठिकाणी मोपेडवरून रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला कसबा बावड्याहून भरधाव वेगाने आलेल्या स्पोर्टस बाईकने धडक दिली होती. या अपघातात माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांचा मुलगा गौतम राजाराम गायकवाड (40, रा. रमणमळा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रुग्णवाहिका मिळण्यास विलंब झाल्यामुळे गंभीर जखमी गौतम यांना ‘गोल्डन अवर’ गमावावा लागला, त्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
शुक्रवार दुपारी घडला भीषण अपघात शुक्रवारी दुपारी साडेदोन वाजता गौतम आणि पत्नी सारिका गायकवाड (वय 35) बँकेच्या कामानिमित्त ताराबाई पार्कहून मोपेडवरून (MH 09 AG 8032) रमणमळ्याकडे निघाले होते. सेंट झेवियर्स स्कूलच्या मागील रस्त्यावरून मुख्य रस्ता ओलांडताना कसबा बावड्याहून रमणमळा चौकाकडून महावीर कॉलेज दिशेने वेगाने येणाऱ्या स्पोर्टस बाईकने (नं. MH 09 AB 4211) मोपेडला समोरासमोर धडक दिली. ही बाईक अल्पवयीन मुलगा चालवत होता. या धडकेत दोघेही हवेत उडाले; यावेळी गौतम यांचे डोके जोरात आदळले, तर सारिका यांचे पाय गंभीररीत्या जखमी झाले.
अपघातानंतर विव्हळणाऱ्या दाम्पत्याला ओळखून स्थानिकांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला. मात्र, बाईकवरील अल्पवयीन चालक आणि पाठीमागे बसलेला व्यक्ती पळून गेला. रुग्णवाहिका बोलावण्यातच 15-20 मिनिटे उलटली. सीपीआर रुग्णालयात दाखल केल्यानंतर गौतमची हालचाल नाहीशी झाली. गौतम यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने कुटुंबीयांनी शुक्रवारी सायंकाळी त्यांना सीपीआर रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवले, पण शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई तीव्र शाहूपुरी पोलिसांनी तपासात बाईक अल्पवयीन चालकाच्या मामाची असल्याचे निदर्शनास आले. अपघातावेळी मामा मागे बसलेला होता. अल्पवयीन मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या मामाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परिवारावर शोककळा दुधाचा व्यवसाय आणि खासगी नोकरीतून कुटुंब चालवणारे गौतम हे माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांचे चिरंजीव होते. पत्नी, मुलगा आणि मुलगी असलेल्या गौतम यांच्या निधनाने रमणमळ्यात शोककळा पसरली आहे. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान घटनेने अल्पवयीनांना स्पोर्ट्स बाईक देणाऱ्या पालकांची बेजबाबदार वृत्ती आणि नियम धाब्यावर बसवून वाहन चालवण्याची सवय यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा