Pune Married Woman Killed : वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वकीलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने कथित विवाहित प्रेयसीला निर्घृणपणे संपवल्याचे समोर आले आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, येरवडा, पुणे : वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वकीलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने कथित प्रेयसीचे हात-पाय बांधून बॅटने डोके आणि तोंड ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात माहिती लपवल्याने वकिलालाही सहआरोपी करण्यात आले आहे. वकील आणि त्याच्या पत्नीला अटक केली असून, त्यांच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.
पूनम दिनेश मून (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे, तर ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती सावंत यांना अटक करण्यात आली आहे.
वकिलाच्या कार्यालयात सहाय्यक
पूनम साडेतीन वर्षांपासून सावंत याच्या कार्यालयात सहायक (सेक्रेटरी) म्हणून नोकरी करीत होत्या. गुरुवारी (१६ एप्रिल) त्या नेहमीप्रमाणे ऑफिसला आल्या होत्या. दुपारी चार वाजताच्या सुमारास पूनम यांचे पती दिनेश यांनी पत्नीला फोन केला; पण त्यांनी फोन उचलला नाही. काही वेळाने फोन बंद झाला.
पतीची शोधाशोध
रात्री आठ वाजले, तरीही पूनम घरी आल्या नाहीत; त्यामुळे दिनेशने ॲड. संजय सावंत याच्याशी मोबाइलवर संपर्क साधून पत्नी अद्याप घरी आली नसल्याचे सांगितले होते. त्या वेळी ॲड. सावंत याने पूनम मैत्रीण किंवा नातेवाइकांच्या घरी गेल्या असाव्यात, असे सांगितले. रात्री ११ वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. Solapur Crime : नवऱ्याशी भांडून माहेरी, रीलस्टार सोनाली जाधवचा अनैतिक संबंधातून घात, वाढदिवसालाच प्रियकराने जीव घेतला
ॲड. संजय सावंतच्या ऑफिसमध्ये बॉडी
दिनेश शुक्रवारी सकाळी वकिलाच्या कार्यालयाकडे आले. शटरला कुलूप नसल्याने दिनेश शटर उघडून आत गेले असता पूनम रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसून आली. त्यांनतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे राजेंद्र मुळीक यांनी घटनास्थळी भेट दिली.
उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांची भेट, मग पत्र लिहिलं; राज ठाकरेंची बीएमसीत धडाकेबाज एन्ट्री
कट रचून खून
ॲड. सावंत आणि पत्नी स्वाती यांना रात्री अटक करण्यात आली असून, त्यांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे, असे चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश बडाख सांगितले. Amravati Crime : पहिल्या ब्रेकअपमुळे प्लेबॉय बनलो; 180 मुलींचं शोषण करणाऱ्या अयानची निर्लज्ज कबुली, स्टोरी ऐकून पोलीस चक्रावले वकिलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने पूनमचा खून करून बॉडी कार्यालयातच ठेवला होता. ही घटना लपवल्यामुळे वकिलालाही सहआरोपी केले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा