Nida Khan News: निदा खान ही नाशिकमध्ये ज्या ठिकाणी वास्तव्यास होती तेथून तिच्या कुटुंबातील इतर सदस्य हेदेखील घराला टाळा ठोकून अज्ञातस्थळी वास्तव्य करत आहेत.
पुण्यात शिक्षण, नाशिकमधील TCS मध्ये पायथन डेव्हलपर; निदा खानचं बॉम्बस्फोट केसमध्येही कनेक्शन?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिकच्या नामांकित कंपनीत कथित धर्मांतर दबाव आणि धार्मिक भावना दुखावण्यासह महिला अत्याचार प्रकरणात शहर पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करत पोलिस आयुक्तांच्या आदेशाने SIT स्थापन केली आणि या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंतच्या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण ६ संशयितांना बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर दोन महिला कर्मचाऱ्यांचेही या प्रकणात सहआरोपी म्हणून नाव समोर आले. यातील एक आरोपी म्हणजे निदा खान आणि दुसरी अश्विनी चैनानी. निदा खान ही सध्या फरार असून, पोलिसांनी कंपनीतील एच.आर. अश्विनी चैनानी हिला ताब्यात घेतलं आहे. फरार असलेल्या निदा खान हिच्याबाबत आता वेगवेगळी माहिती समोर येत असून तिचा बॉम्बस्फोट प्रकरणाशीही संबंध आहे का, या अनुषंगाने आता यंत्रणांकडून तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या धर्मांतरण दबाव, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि अॅस्ट्रोसिटी या दाखल गुन्ह्यात संशयित दानिश याला निदा खान हिने मदत केली असल्याचा तिच्यावर आरोप असून सदर प्रकरणात पोलीस तिचा शोध घेत आहेत.
निदा खान नक्की कोण आहे?
निदा एजाज खान (२६) असे तिचे पूर्ण नाव आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून तिने पदवी घेतली आहे. एम. ई.बी.टेक. चे शिक्षण तिने पूर्ण केले असून नाशिकच्या द्वारका परिसरात निदा हिचे माहेर आहे. पुणे आणि मुंबई येथे देखील तिने आय.टी. कंपनीत डेव्हलपर म्हणून काम केलेले असल्याची माहिती आहे. त्यानंतर २०२१ पासून ती नाशिकच्या TCS कंपनीत पायथन डेव्हलपर्स म्हणून काम करत होती.
धर्मांतर दबाव आणि महिला अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा फरार झाली आहे. ती भिवंडी येथे असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पोलिसांचे एक पथक तिथे गेले असता ती आढळून आलेली नसल्याची माहिती देखील आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता SIT ने सर्व बाजूने विचार करून राष्ट्रीय तपास यंत्रांना याबाबत कळवले आहे. त्यानुसार आता या सर्व प्रकाराचा राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून तपास केला जात आहे. देशात घडलेल्या काही दहशतवादी घटनांमध्ये संशयित असलेल्यांशी तिचे काही कनेक्शन आहे का? त्या दिशेने देखील तपास सुरू आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला व्यापक वळण मिळण्याची शक्यता आहे.
निदा खान हिने आपण गरोदर असल्याचे सांगत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. या प्रकरणात निदा खान हिचा काहीही एक संबंध नसल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. तसंच इतर संशयितांच्या नातेवाईकांनी देखील हा एक प्रेम प्रकरणातील विषय होता, बाकी सगळे गुन्हे हे खोटे असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, आता SIT कडून राष्ट्रीय तपास यंत्रणा ATS, NIA यांना याबाबत कळवण्यात आलेले असून सदर यंत्रणांकडून देखील आता या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. तपासात काय सद्य समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा