Heatwave Alert: महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. 19 आणि 20 एप्रिलदरम्यान राज्यातील अनेक भागात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे. काही ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 एप्रिलला कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना, यासोबतच धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना दुपारी 1 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडणयाचं आवाहन करण्यात आलं आहे.
