• Sat. Jun 6th, 2026
    Sangli Crime: बायकोसाठी आईचा जीव घेतला; तोंड दाबून लेकानेच माऊलीला संपवलं; सांगलीतील घटनेनं सगळेच सुन्न

    Sangli Murder Case: कौटुंबिक वादाच्या कारणावरून संशयित मुलगा जगदीश याने बुधवारी मध्यरात्री आई संगीता हिचे तोंड दाबून जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

    सांगली हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सांगली: मिरज तालुक्यातील मानमोडी इथं मुलाने पत्नीस घरात ठेवण्यास आईचा असलेला विरोध आणि इतर घरगुती भांडणाच्या रागातून आईचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. मुलाने आईचे नाक आणि तोंड दाबून तिला जीवे मारले असून या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. संगीता जीवन झेंडे असे 51 वर्षीय मयत महिलेचं नाव आहे. याबाबत नातेवाईक बजरंग तुकाराम काशिद यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी मुलगा जगदीश जीवन झेंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील मानमोडी येथे संशयित जगदीश जीवन झेंडे हा आपल्या आईसोबत राहत होता. त्याची पत्नी सोनाली ही माहेरी राहत होती. सोनालीला घरात ठेवण्यास आईचा विरोध होता, असं सांगितलं जात आहे. यामुळे झालेल्या वादातून आणि घरगुती भांडणाच्या कारणावरून संशयित जगदीशने बुधवारी मध्यरात्री आई संगीता हिला तोंड दाबून जीवे मारल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

    या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि ‘आयुष हेल्पलाईन’ टीमच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.

    दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित जगदीश झेंडे याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या जगदीशने अखेर आपला गुन्हा कबूल केला असून याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा