Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उपनेत्या (उबाठा) सुषमा अंधारे या उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मतांचा कोटा ठरणार निर्णायक
विधान परिषदेच्या नऊ जागांपैकी आठ जागा या महायुतीच्या पारड्यात जाणार असून, महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. या निवडणुकीत एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजप (१३१ आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७ आमदार), तर दिवंगत नेते अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (४० आमदार) अशी मतदारांची संख्या आहे. मतांची जुळवाजुळव व्यवस्थित केल्यास ‘महायुती’चे आठ आमदार सहज निवडून येणार आहेत. महाविकास आघाडीने सर्वांनी मिळून एक उमेदवार दिल्यास तसेच त्यांच्या मतांमध्ये फूट न पडल्यास त्यांचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो. भाजपला किमान चार तर कमाल पाच जागा मिळणार असल्याने यापैकी एका जागेवर वर्णी लागावी, यासाठी पुण्यातून ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली आहे.
डॉ. नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधीची शक्यता
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनाही विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेसाठी महत्वाची भूमिका बजावली होती. शिवसेनेसाठी त्यांनी विधान परिषदेमध्येही आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. शिवसेनेला विधान परिषदेच्या दोन जागा मिळणार असून, त्यापैकी एक जागा मिळावी, यासाठी त्या प्रयत्नशील असून, त्यांच्या नावाचा पुन्हा विचार होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Vinod Tawde : बिहारमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री, विनोद तावडेंची पडद्यामागून शिष्टाई, गुप्तपणे सत्तेचे दरवाजे उघडले
भाजपमध्येही फील्डिंग
भाजपचे प्रदेश सरचिटणीस पांडे पुण्यातून विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या काही वर्षांत प्रदेश सरचिटणीस यांना आमदार, खासदारकीची उमेदवारी दिल्याची उदाहरणे आहेत. यापूर्वीचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांना विधान परिषदेवर, तर पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे पांडे यांना या वेळी संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा आहे.
MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी चढाओढ, महायुती महाविकास आघाडीची धाकधूक वाढणार?
सुषमा अंधारेंच्या नावाचा विचार
महाविकास आघाडीकडून या वेळी काँग्रेस आणि शिवसेनेकडून (उबाठा) उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न होईल. शिवसेनेकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास सुषमा अंधारे यांच्या नावाचा पुण्यातून विचार होऊ शकतो. काँग्रेसकडून पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडून पुन्हा एकदा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या नऊ जागांवर निवडणूक होत असली, तरी प्रत्येक पक्षाकडून उमेदवारीसाठी पुण्यातील नेत्यांकडून प्रयत्न होत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे.
Vinod Kambli : विनोद कांबळीच्या मेंदूत ब्लड क्लॉट, ब्रेन स्ट्रोकसह स्मृतीभ्रंशाचा धोका, बालमित्र सचिनसह माजी क्रिकेटपटू मदतीला
पार्थ पवारांचा निकटवर्तीय स्पर्धेत
दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत एक जागा निश्चित मिळणार आहे. या जागेवर वर्णी लावण्यासाठी राज्यभरातून दोन डझनांहून अधिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. नवनिर्वाचित खासदार व अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे विक्रांत काकडे; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या नावाचा ‘राष्ट्रवादी’तून गांभीर्याने विचार होऊ शकतो. ‘राष्ट्रवादी’त सध्या सुरू असलेले महाभारत पाहता या एका जागेवर वर्णी लागण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले भोरचे रणजित शिवतरेंनीही उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
