Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. नाशिकमधल्या भोंदूबाबा प्रकरणानंतर आता जळगावमध्ये देखील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
जळगाव शहरात अघोरी विद्या करणे, घरातील बाधा दूर करणे आणि गुप्तधन देण्याच्या नावाखाली एका महिला ग्राफिक्स डिझायनरची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोंदूबाबा ललित पाटील आणि त्याची महिला पोलीस कर्मचारी पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्याविरुद्ध २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, साडेतीन ते चार वर्षांचा कालावधी उलटूनही दोन्ही आरोपी अद्याप फरारच आहेत. पीडित फिर्यादी महिलेनं नुकतीच जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेत आरोपींना शोधून तिचे पैसे परत मिळवून देण्याची विनंती केली आहे.
Nashik TCS Case : ‘मला जेलमध्ये इतर कैद्यांकडून मारहाण’, आरोपी शफी शेखचा कोर्टात दावा, सुनावणीत काय-काय घडलं?
‘त्याच्या आत्म्याने तुझ्या घरात प्रवेश केला आहे’
कॉलेजपासूनच महिमा पाटील आणि पीडित महिला या एकमेकांना ओळखत होत्या. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलेनं मैत्रिणीशी संपर्क साधला महिमाने माझ्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचं सांगून त्यांच्याकडे उपाय असल्याचं तिला पटवून दिलं. त्यानंतर ललित पाटील यांनी ‘माझ्या अंगात ‘पीर बाबा’ येतात’, असं भासवत अघोरी विद्या सुरू केली. पीडित महिलेच्या ‘तुझ्या पतीच्या भावाने आत्महत्या केली असून, त्याच्या आत्म्याने तुझ्या घरात प्रवेश केला आहे, म्हणून तुमच्या घरात वाद आहे. तुझ्या पतीच्या भावाचा आत्मा तुला त्रास देतोय, म्हणून तुझ्यावर असे प्रसंग पुन्हा पुन्हा ओढवत राहणार’, असं भोंदूबाबा ललित पाटील याने सांगितलं.
उज्जैन येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा
‘तुझ्या घरावर करणी केली आहे. ती बाधा काढून घेण्यासाठी तुला पूजा करावीच लागेल’, अशा पद्धतीने आरोपींनी पीडित महिलेला तिच्या कुटुंबावर करणी झाल्याची भीती दाखवून आपल्या घरी पूजा करून सुरुवातीला लहान रक्कम घेतली. त्यानंतर ‘गुप्तधन’ मिळवून देण्याचं आमिष दाखवत वेळोवेळी लाखो रुपये उकळले. सदरची रक्कम पीडित महिलेनं ऑनलाईन व्यवहाराद्वारे दिली. फसवणुकीचा भाग म्हणून आरोपींनी पीडित महिलेचा इतर देशभर फिरवलं. उज्जैन येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा, गोगामेडी, पुष्कर, अजमेर आणि ओंकारेश्वर येथे विधीवत विधी करण्यात आले. तसेच भारत पाकिस्तान सीमेवर माता मंदिर येथे विशेष पूजा केल्याचं सांगून मोठी रक्कम उकळण्यात आली.
Chhatrapati Sambhajinagar : ‘घरी बायकोला काय तोंड दाखवू?’; सिलिंडर मिळत नसल्यानं नवऱ्याचा संयम सुटला; एजन्सीसमोरच धक्कादायक प्रकार
‘तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेल’
सर्व फिरून आल्यानंतर पीडित महिलेच्या घरात आरोपी दाम्पत्याने मुक्काम केला, आणि घरातील बाधा काढण्याच्या नावाखाली पुन्हा पैशांची मागणी केली. बाहेरून कर्ज काढून सातत्याने पैसे देऊनही काहीच फरक पडत न पडल्यानं पीडित महिलेनं पैसे परत मागितले. त्यानंतर आरोपी ललित पाटील याने ‘मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेल’, अशी गंभीर धमकी दिली.
TCS Nashik Case : मूल होत नसेल तर बायकोला माझ्याकडे पाठव, आरोपींचा घाणेरडा सल्ला, टीसीएस नाशिक कर्मचाऱ्याने रडत आपबिती सांगितली
फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी
सदर पीडित महिलेनं जळगाव येथील रामानंद पोलिसांत गुन्हा दाखल केला. आरोपी महिमा पाटील ही भांडूप येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे पोलिसांनी धाव घेतली. मात्र, तेथेही ती आढळून आली नाही. पोलिसांचं पथक सातत्याने आरोपींचा शोध घेत असलं तरी अद्याप त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या घटनेबाबत गुन्हा दाखल करायला साडेतीन वर्ष उलटूनही आरोपी सापडत नसल्यानं पीडित महिलेनं पोलीस अधीक्षकांची काल भेट घेऊन आरोपींचा शोध लावून आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपी महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळे तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे.
