सुमेधला सतत ताप, पोटात कळा, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला पोटाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, ताप कमी न होणे आणि पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होत असल्याने पुढील तपासण्या करण्यात आल्या. अल्ट्रासाऊंडमध्ये एक्यूट अपेंडिसायटिसचा संशय आल्याने त्याला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.
Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईशस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना पोटात पू आढळला. लॅप्रोस्कोपिक सक्शन उपकरणाला दोन निओडिमियम चुंबक घट्ट चिकटले तेव्हा मुलाने ते गिळल्याचे स्पष्ट झाले. तपासणीत त्याच्या आतड्यांना दोन छिद्रे पडल्याचे दिसले. डॉक्टरांनी ही छिद्रे दुरुस्त केली आणि अपेंडिक्सही काढले. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. नंतर पालकांना घरच्या खेळण्यांत तसेच चुंबक आढळले.
चुंबक गिळणे धोकादायक का ?
लहान मुलांनी एखादी छोटी वस्तू गिळणे ही सामान्य बाब असली, तरी सर्व वस्तू सारख्या धोकादायक नसतात. काही वस्तू शरीराला नुकसान न पोहोचवता पचनसंस्थेतून बाहेर पडतात. मात्र, चुंबकांबाबत धोका मोठा असतो. एकापेक्षा जास्त शक्तिशाली चुंबक गिळले गेल्यास ते आतड्यांच्या वेगवेगळ्या थरांच्या आरपार एकमेकांना खेचू लागतात. या दाबामुळे त्या भागातील रक्तप्रवाह थांबू शकतो. परिणामी आतड्यांच्या पेशींचे नुकसान होऊन छिद्रे पडू शकतात.
Nashik Bribe Case: नाशिक महापालिकेचा लाचखोर सहाय्यक अधीक्षक ACBच्या जाळ्यात; घरपट्टीसाठी स्वीकारले 60 हजार, प्रकरण काय?निओडिमियम चुंबक अधिक धोकादायक ठरतात. ही चुंबके आकाराने लहान असली, तरी अत्यंत शक्तिशाली असतात. मॅग्नेटिक बिल्डिंग सेट, पझल बॉल्स, फिजेट टॉईज, दागिन्यांसारख्या वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू आणि काही घरगुती उत्पादनांमध्ये अशी चुंबके आढळतात. घरातील कुणाच्याही लक्षात न येता लहान मुले ही चुंबके गिळू शकतात. सुरुवातीची लक्षणे पोटाचा संसर्ग किंवा अपेंडिसायटिससारखी दिसतात.
ही लक्षणे दिसल्यास त्वरित लक्ष द्या
पोटदुखी, उलट्या, ताप, जुलाब, पोट फुगणे, असामान्यपणे रडणे, आळस किंवा सतत अस्वस्थता, खाणे-पिणे कमी होणे, लहान मुले एखादी वस्तू गिळल्याचे स्वतःहून सांगत नाहीत. अनेकदा त्यांना नेमके काय झाले आहे, हेही सांगता येत नाही. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
