• Tue. Jun 9th, 2026

    Pune News: मध्यरात्री महामार्गावर दाम्पत्याला उतरवलं; कोल्हापूर ते पुणे ई-शिवाई बसचालकाचा उर्मटपणा, प्रकरण काय?

    Pune News: मध्यरात्री महामार्गावर दाम्पत्याला उतरवलं; कोल्हापूर ते पुणे ई-शिवाई बसचालकाचा उर्मटपणा, प्रकरण काय?

    E-Shivai Kolhapur to Pune: कोल्हापूर ते पुणे ई-शिवाई प्रवासादरम्यान चालकाने धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, सतत हॉर्न वाजवणे आणि प्रवाशांशी उद्धटपणे वागणे असे प्रकार केल्याने तणाव निर्माण झाला होता.

    ई-शिवाई बस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या ई-शिवाई बसमधील चालकाच्या गैरवर्तनामुळे प्रवाशांना धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. एका प्रवाशाने जाब विचारल्यामुळे संबंधित दाम्पत्याला कराडजवळ मध्यरात्री महामार्गावर उतरवण्यात आल्याची गंभीर घटना घडली.

    बसचालकाकडून प्रवासादरम्यान अश्लील भाषेत बोलणे, वेडीवाकडी वळणे घेणे, असे प्रकार सुरू होते. या घटनेबाबत प्रवाशांनी नापसंती व्यक्त केली असली तरी एसटी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणी चौकशी करून संबंधित चालकावर कारवाई केली जाईल, असे पुणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.

    Maharashtra TimesPune Crime : आधी गोळी झाडली, लागली नाही म्हणून जे मिळेल त्यानं मारलं; पुण्यात मध्यरात्री तरुणाला निर्घृणपणे संपवलं
    काय झाले होते?
    -कोल्हापूर येथून पुण्याकडे रविवारी रात्री साडेदहा वाजता निघालेल्या (एमएच १२ व्हीटी ०७३७) या ई-शिवाई बसमध्ये चालकाने वारंवार जोरात ब्रेक लावणे, बस वेडीवाकडी चालवणे; तसेच अश्लील भाषेत बोलणे सुरू केले.
    -रात्रीचा प्रवास असूनही सततच्या हॉर्नमुळे आणि अस्थिर ड्रायव्हिंगमुळे प्रवाशांना झोप घेणेही अशक्य झाले.
    -प्रवाशांनी बस व्यवस्थित चालवण्याची विनंती केल्यानंतर चालकाने अरेरावीची भाषा वापरली. प्रवासी लक्ष्मण फाळके यांनी चालकाला जाब विचारला
    Maharashtra TimesPune Heatwave : पुण्यात यंदा विक्रमी तापमान! उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर
    वाद गेला टोकाला वाद
    -वाढल्यानंतर कराडजवळील टोलनाक्याच्या अलीकडे चालकाने बस थांबवून फाळके आणि त्यांच्या पत्नीला खाली उतरवले. -मध्यरात्री महामार्गावर सोडून बस निघण्याच्या तयारीत असताना इतर प्रवाशांनी तीव्र विरोध दर्शवला.
    -प्रवाशांच्या दबावामुळे अखेर चालकाने त्या दाम्पत्याला पुन्हा बसमध्ये घेतले. त्यानंतरही चालकाच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. संपूर्ण प्रवासात प्रवाशांना भीतीच्या वातावरणात प्रवास करावा लागला.

    चालकाने पूर्ण मार्गावर बस वेडीवाकडी चालवली. सतत हॉर्न वाजवल्यामुळे प्रवाशांना आराम बसचालकाला बसचालक जाब विचारल्यामुळे त्याने मला व पत्नीला मध्यरात्री महामार्गावर उतरवले. ही बस ठेकेदारामार्फत चालवली जाते. यावरील चालक असे वागत असतील; तर त्यांच्यावर ठोस कारवाई होण्याची गरज आहे. – लक्ष्मण फाळके, पुणे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा