• Sun. Jun 14th, 2026
    Pune Crime : असहाय्यतेचा गैरफायदा घेत ओळखीच्या व्यक्तीकडून मतिमंद महिलेवर अत्याचार, पुण्यात संतापजनक प्रकार, आरोपी फरार

    Pune Crime News : पर्वती परिसरात एका असहाय्य मतिमंद महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमाने महिलेच्या मानसिक स्थितीचा फायदा घेत तिला धमकावून कृत्य केले.

    पुण्यात मतिमंद महिलेवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, आता एका मतिमंद महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पर्वती परिसरात उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या असहायतेचा फायदा घेत नराधमाने तिला धमकावून हे कृत्य केले. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, पर्वती पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे की गुन्हेगारीचे? रोजरोज होणारे महिलांवरील अत्याचार, कोयता गँगचा हैदोस नागरिकांना हादरवून टाकत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    पुण्यातील पर्वती परिसरात मतिमंद महिलेवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी पर्वती पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीला महिलेची मानसिक अवस्था म्हणजेच तिची असहाय्य परिस्थिती माहिती होती. या अवस्थेचा गैरफायदा घेत आरोपीने तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

    गुन्हा दाखल, शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना

    घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली असून घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    Maharashtra TimesPune Crime : ’50 लाख दिल्याशिवाय सुटका नाही’; कॅफेत गप्पा, प्लॅन्ट दाखवायला नेलं अन् पुढे थेट किडनॅप; देणी वसूल करण्यासाठी मेट्रो कंत्राटदारासोबत खळबळजनक प्रकार

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली असून त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.

    कठोर कारवाईची मागणी

    या घटनेमुळे पर्वती परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : मृत्यूशी झुंज देत हायकोर्टाचा वकील 150 मीटर धावला, पण मारेकऱ्यांनी डाव साधलाच; क्लायंटला भेटायला गेले अन् घात झाला!

    एकूणच, असहाय्य आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल महिलेवर झालेल्या या प्रकारामुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आरोपीच्या विकृत विचारांचा आणि कृत्याचा निषेध करण्यात येत आहे. मात्र अशा रोजच्या गंभीर घटना कमी कधी होणार? असा नागरिकांना प्रश्न पडत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा