• Sat. Jun 13th, 2026

    Goregaon NESCO म्युझिक कॉन्सर्टचं रेटकार्ड व्हायरल; 3 हजारांपासून तीन लाखांचं तिकीट, अव्वाच्या सव्वा दर तरीही तोबा गर्दी

    Goregaon NESCO म्युझिक कॉन्सर्टचं रेटकार्ड व्हायरल; 3 हजारांपासून तीन लाखांचं तिकीट, अव्वाच्या सव्वा दर तरीही तोबा गर्दी

    Mumbai Concert Tragedy: गोरेगाव येथील नेस्को लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट तिकिटांचे रेटकार्ड समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. तिकीटाची किंमत ऐकून शॉक बसेल.

    नेस्को कॉन्सर्ट रेटकार्ड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : नेस्को सेंटरमधील ‘९९९९९९९९९- टेक्नो इव्हेन्ट’ या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट तिकिटांचे रेटकार्ड समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये तीन हजारांपासून तीन लाखांपर्यंत तिकीट दर दाखविण्यात आला आहे. या रेटकार्डप्रमाणे दर आकारले गेलेत का आणि इतक्या मोठ्या रकमांच्या तिकीट विक्री करण्यामागील नेमके कारण कोणते, याचा तपास पोलिस करीत आहेत.

    नेस्कोमध्ये आयोजित केलेल्या संगीत रजनीची समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली. यामध्ये तिकिटांचे रेटकार्ड असून श्रेणी आणि आसन व्यवस्थेनुसार तिकिटांचे दर देण्यात आले आहेत. जनरल तिकीट, साधी तिकीट, स्टेज टेबल, व्हीआयपी टेबल अशा वेगवेगळ्या श्रेणीनुसार ३ हजारांपासून तीन लाखांपर्यंतचे दर या रेटकार्डमध्ये देण्यात आले आहेत. या तिकिटांची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी दोन्ही प्रकारे करण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्षात इतकी रक्कम आकारली गेली का, याबाबत तपास केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

    Maharashtra TimesMumbai Concert Tragedy : संगीत कार्यक्रमांवर अचानक छापे टाकणार, पोलिसांचा विचार; मुंबईत पहाटे धाड, 26 लाखांच्या 200 गोळ्या जप्त
    १६ जणांचे जबाब
    पोलिसांनी ११ एप्रिलच्या घटनेनंतर चौकशीचा फास आवळला आहे. अटक आरोपींची कसून चौकशी केली जात असता मृत विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील अन्य उपस्थितांचे जबाब नोंदविले जात आहेत. आतापर्यंत १६ ते १७ जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या जबाबातून पुढे आलेल्या माहितीची खातरजमा केली जात असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.
    Maharashtra TimesMumbai Concert Tragedy : रौनकने पिवळी गोळी दिली, मग काही आठवत नाही, थेट हॉस्पिटलमध्येच उठले; म्युझिक कॉन्सर्टना नशेचा विळखा, बचावलेल्या तरुणीचा चक्रावणारा जबाब
    पटेलच्या पुढील साखळीचा शोध
    आनंद पटेल याने पोर्टल ऍपद्वारे कुरियरने कल्याणहून सुमारे १० पेक्षा अधिक ड्रग्जच्या गोळ्या पाठविल्या होत्या. या गोळ्या त्याने कुठून आणल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून काहींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेत असलेला विद्यार्थी प्रतीक पांडे हा कल्याणचा असून याच्या मार्फतीने आनंद हे इतरांच्या संपर्कात आले. गोळ्यांच्या बदल्यात या सर्वांमध्ये कोणते आर्थिक व्यवहार झालेत याचीही तपासणी केली जात अ

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा