Goregaon Live Concert Ecstasy Overdose Death : दोघांनी कॉन्सर्टच्या आधी आणि कार्यक्रमादरम्यान ‘एक्स्टसी’च्या गोळ्यांचे सेवन केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचा ओव्हरडोस झाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. एमबीएचे शिक्षण घेणारे दोघेही मयत विद्यार्थी ऐन विशीतील होते. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव भागात या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे दोन हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचा ओव्हरडोस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दोन ते तीन हजार तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान जास्त प्रमाणात मद्यपान आणि अमली पदार्थ घेतल्यामुळे काहींना त्रास झाला. त्यांची प्रकृती खालवल्यामुळे यातील दोघांना जोगेश्वरी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
तरुणीचाही मृत्यू
गोरेगाव पश्चिमेकडील लाईफ लाईन रुग्णालयात एका मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. लाईफ लाईन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तरुणाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र ट्रॉमा केअर रुग्णालयातील तरुणींना डिस्चार्ज दिल्यानंतर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी एकीचा मृत्यू झाला.
मृत तरुण आणि तरुणी हे दक्षिण मुंबईतील एका प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होते. ते १५ विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपसह या लाईव्ह कॉन्सर्टला उपस्थित होते. पोलिसांनी मयत विद्यार्थ्यांची ओळख सांगण्यास नकार दिला आहे. Crime News : 6 वर्षांचं रिलेशन, वेड्यासारखं प्रेम केलं, पण तिने दगा दिला; 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीमुळे गर्लफ्रेण्डवर गुन्हा
गोळ्यांचे सेवन जीवावर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांनी कॉन्सर्टच्या आधी आणि कार्यक्रमादरम्यान ‘एक्स्टसी’च्या गोळ्यांचे सेवन केले असावे, असा संशय आहे. कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले; त्यानंतर त्यातील एकाला उपनगरातील रुग्णालयात, तर दुसऱ्याला दक्षिण मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दोघांचाही १२ एप्रिल रोजी मृत्यू झाला.
Asha Bhosale passed away | ज्येष्ठ गायिका आशाताईंना भावपूर्ण निरोप, राजकीय नेते, कलाकारही उपस्थित
पाच जणांना अटक
या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजनाशी संबंधित दोन एमबीए विद्यार्थी आणि अमली पदार्थ पुरवठादार अशा पाच जणांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या मित्रांकडे चौकशी केली असता, त्यांच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांना ‘एक्स्टसी’च्या गोळ्या पुरवल्याचे आढळून आले. त्यानंतर या दोन्ही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. Beed Crime : भावाला पासवर्ड पाठवला, डॉ दाभाडेंनी जीव दिला; अंत्यविधीनंतर दादाने फोन उघडताच धक्का, शरीरसंबंधाला प्रवृत्त करत टोक गाठलं लाईव्ह कॉन्सर्टच्या आयोजनाशी संबंधित अन्य तीन व्यक्तींनाही— ज्यामध्ये प्रदर्शन स्थळावरील एका वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्याचा समावेश होता—अटक करण्यात आली. पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळेच कार्यक्रमस्थळी अंमली पदार्थ आणले गेले आणि त्यांचे सेवन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा