• Sun. Jun 7th, 2026
    Kolhapur Crime: कोल्हापुरात 28 वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू; सोन्याच्या लोभाने बळी? पतीला पोलिसांकडून अटक

    Kolhapur News: काही दिवसांपूर्वीच मारहाण झाल्याची तक्रार तिने आई-वडिलांना केली होती. चार दिवस माहेरी राहिल्यानंतर (11 एप्रिल) शनिवारी मुलांच्या मुलांच्या ओढीने ती सासरी परतली होती.

    कोल्हापुरात 28 वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू; सोन्याच्या लोभाने विवाहितेचा बळी? पतीला पोलिसांकडून अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील तरसंबळे गावात रविवारी रात्री घडलेल्या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विवाहित रूपाली प्रवीण गुरव (वय 28) हिच्या मृत्यूमागे सासरच्या बाजूने केलेला सततचा छळ आणि दहा तोळे सोन्याच्या मागणीमुळे घातपात झाल्याचा गंभीर आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणात पती प्रवीण गुरव याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, निष्पक्ष तपास आणि न्यायाची मागणी नातेवाईक करत आहेत.

    विवाहानंतर सुरू झाला छळाचा त्रास

    राधानगरी येथील पांडुरंग गुरव यांची कन्या रूपालीचा विवाह 2018 मध्ये तरसंबळे येथील प्रवीण गुरव यांच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांतच सासू-सासऱ्यांसह पतीने दहा तोळे सोन्याची मागणी सुरू केली. याशिवाय माहेरील शेतजमिनीचे हस्तांतरणही करून द्यावे, अशी सक्ती केली जात होती. यामुळे रूपालीला सतत मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता. तिला दोन लहान मुले असूनही सासरच्या या वागण्यामुळे ती वारंवार माहेरी परत येत होती. नातेवाईकांच्या माहितीनुसार, अनेकदा मध्यस्थीच्या बैठका झाल्या; पण तरीही छळ थांबला नाही.

    रात्री झाला संशयास्पद मृत्यू

    शनिवार रात्री सासरी गेल्यानंतर रविवारी रात्री अचानक रूपालीचा मृत्यू झाला. ही घटना कळताच नातेवाईकांनी ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह राधानगरी ग्रामीण रुग्णालयात नेला. प्राथमिक तपासात संशय निर्माण झाल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

    राधानगरी पोलिस ठाण्यात पांडुरंग गुरव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रकरणात पती प्रवीण गुरव याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, सासू-सासऱ्यांच्याही जबाबांची नोंद घेतली जात आहे. विवाहातील हुंडा मागणी आणि छळाचा आरोप असल्याने याबाबतच्या कलमाखाली गुन्हा दाखल आहे. रूपालीच्या आई-वडिलांनी भावनिक होऊन मुलीला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे तरसंबळे गावात आणि राधानगरी तालुक्यात हुंडा प्रथेविरोधात संताप निर्माण झाला असून, नागरिकांकडून अशा घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक तपासात नवीन धागे सापडण्याची शक्यता आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा