• Sun. Sep 6th, 2026
Asha Bhosle | आशा भोसलेंना शेवटचं अभिवादन, रश्मी ठाकरे-सचिन तेंडुलकर यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गेली अनेक वर्ष भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांची रविवार १२ एप्रिल रोजी प्राणज्योत मालवली. लोअर परळमधील त्यांच्या निवासस्थानी आशा भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. यावेळी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्यासह देशातील अनेक दिग्गज पोहोचत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर देखील पत्नी अंजलीसह आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचला. आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर झाले. आशा भोसले यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करताना सचिन तेंडुलकर यांना अश्रू अनावर झाले.तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह अंत्यदर्शनाला पोहोचले. यावेळी रश्मी ठाकरे देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed