जळगावात धक्कादाक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी राज्य सरकारकडून मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी राहिली आहे त्या महिलाकंडून ई-केवायसी केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला ई-केवायसीसाठी ई-सेवा कार्यालय किंवा इतर कुणाची मदत घेत आहेत. पण जळगावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ई-केवायसी करुन देण्याच्या मोबदल्यात एका नराधमाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. तसेच इतर एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गोकुळ चव्हाण या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी गोकुळ चव्हाण हा लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याच्या निमित्ताने महिलेच्या घरी गेला. तिथे त्याने ई-केवायसीसाठी कागदपत्रे मागितली. यानंतर गोकुळ चव्हाण याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्याचं एवढंच कृत्य नाही. तर आणखी एक कृत्य समोर आलं आहे. त्याने अन्य एका महिलेला निवृत्त वेतन पुन्हा सुरु करुन देतो असं सांगून प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जी आवश्यक प्रक्रिया पार करावी लागते, ती पूर्ण करुन देण्यासाठी आरोपीने महिलांकडे शरीरसुखाची आणि प्रेम संबंधाची मागणी केल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर जळगावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया काय?
पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांवर माहिती दिली. “मला एका शासकीय योजनेच्या डॉक्युमेंट्स संदर्भात गेलो असता माझ्याकडे नंबरची मागणी केली होती आणि मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न केला होता”, असं एका पीडित महिलेने तक्रारीत म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. “हो, त्यांनी फिर्यादीत उल्लेख केलेला आहे. पण ते त्यांच्या पतीचे मित्रच आहेत म्हणून आलेले होते. त्यांच्यात ते संभाषण झालं होतं. पीडितेने सांगितलं होतं की, हा प्रकार मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे”, असं पोलिसांनी सांगितलं. “पीडितेच्या तक्रारीवरुन पाठलाग करणे, मैत्री संपादीत करण्याचा प्रयत्न करणे, सतत महिलेला त्रास देणं या अनुषंगाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे”, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी दिली.
रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्याचे दोन धक्कादायक प्रकरण घडले आहेत. मंत्री महोदय आदिती तटकरे, स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपले याकडे लक्ष आहे का?” असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे.
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाई, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली. तेव्हा मतांसाठी सरसकट महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले. आता मतदान मिळाल्यानंतर मात्र योजनेसाठी विविध अटी, शर्ती लावल्या जात आहे”, अशी टीका देखील रोहिणी खडसे यांनी केली.
“ही E-KYC करत असताना महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कुठे बँक खात्याची अडचण येत आहे, कुठे मोबाईल नंबरची, काही महिलांचे तर सर्व कागदपत्रांची जुळणी झाली असताना त्यांना या योजनेतून बाद केले जात आहे. यामुळे महिलांची प्रचंड धावपळ होत आहे. यात काही राक्षसी वृत्तीचे लोक डाव साधतात. यात तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य कारवाई करा”, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा