• Fri. Jun 5th, 2026
    Solapur News : भोंदूबाबा अशोक खरातचे धागेदोरे सोलापूरपर्यंत, खरातच्या अन् पत्नीच्या नावे करोडोंची जमीन खरेदी

    Solapur Crime News : नाशिकमधील अशोक खरातचे धागेदोरे आता सोलापूरपर्यंत पोहोचले आहेत. अशोक खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे सोलापुरात ११ एकर जमीन आहे.

    अशोक खरात सोलापूर जमीन खरेदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात मालमत्तेचा डोंगर उभारणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता सोलापूरपर्यंत पोहोचले आहेत. काळा पैसा पांढरा करण्यासह जागा, जमिनी, अलिशान फ्लॅटसच्या गुंतवणुकीमधून ‘कुबेर’ बनलेल्या बहुचर्चित अशोक खरातच्या प्रॉपर्टीचं कनेक्शन उत्तर सोलापूर तालुक्यात ‘कळमण’ शिवारांपर्यंत पोहोचले आहे.

    याची आम्हाला कल्पना नव्हती

    अशोक खरात याने या शिवारात एकूण ४ हेक्टर ४८ आर (११ एकर ४ गुंठे) जमीन अडीच वर्षापूर्वी प्रति एकर २० लाख रुपये दराने तब्बल २ कोटी २० लाखास खरेदी केली होती. कळमन शिवारातील गट क्रमांक २००/१ जमिनीवर अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात याच्या नावे नोंद आहेत. कळमन गावातील राजाराम बनसोडे यांच्याकडून अशोक खरातच्या दलालांनी २०२१ साली विकत घेतली. २०२४ मध्ये सोलापुरातील दलालांनी अशोक खरातला ११ एकर ४ गुंठे जमीन विकली. ‘नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग आमच्याच शेतातून जाणार आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. एक दोन वर्षानंतर आम्हाला माहिती झाली, आणि आम्ही जमीन परत मागण्याचा तगादा लावला होता. मात्र, नरखेड येथील सेवानिवृत्त शिक्षकाने ही जमीन २०२४ साली अशोक खरातला विकली होती’, असं राजाराम बनसोडे यांनी सांगितलं.
    Maharashtra TimesJalgaon Crime : ई-केवायसी करण्याच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी, जळगावातील प्रकार, गुन्हा दाखल

    खोटं सांगून आमच्या जमिनी विकत घेतल्या

    राजराम बनसोडे यांना २०२१ साली आर्थिक अडचणी होत्या. मुलीचं लग्न होतं म्हणून त्यांनी नाईलाजाने कळमन शिवारातील गट नं २००/१ ही शेतजमीन सोलापूर जिल्ह्यातील नरखेड (ता. मोहोळ) येथील सेवानिवृत्त शिक्षक कोल्हाळ यांना विकली. जमीन विकताना अशोक खरातच्या दलालांसोबत बोलणी झाली होती. ही जमीन काही दिवसानंतर मला परत देणार आहेत. मात्र त्यांनी मला न देता, अशोक खरातला विक्री केली. शक्तीपीठ महामार्ग गेल्यानंतर येथील जमीनीच्या किमती गगनाला भिडल्या. जवळपास २ कोटी २० लाख रुपयांना अशोक खरातला ही जमीन विकण्यात आली. राजाराम बनसोडे यांनी अशी मागणी केली आहे की, ‘ही जमीन मला परत मिळावी’.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा