अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर शिवाई बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. आई-वडिलांच्या एकुलत्या एक मुलावर काळाने झडप घातली आहे.
मोटारसायकलची बसला समोरासमोर भीषण धडक
या बाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, अथर्व ढगे हा युवक आपल्या दुचाकीवरून (MH 44,D 7483) धानोरा (खुर्द) गावाहून अंबाजोगाईच्या दिशेने कामानिमित्त जात होता. याच वेळी अंबाजोगाईहुन छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस (MH 49 BZ 9581) समोरून येत होती. लोखंडी सावरगाव जवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अथर्वच्या मोटारसायकलची बसला समोरासमोर भीषण धडक बसली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडक बसल्यानंतर गंभीर मार लागल्याने अथर्व ढगे चाजागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मयत अथर्व ढगे याच्या गावात शोककळा पसरली असल्याचे समोर येत आहे.घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Sunetra Pawar : ‘सेवा करता करता दादा गेले, त्यांची स्वप्नं आता पूर्ण करायचीत’; बारामतीत प्रचाराचा नारळ फोडताना सुनेत्रा पवार भावुक
एकुलता एक मुलगा गेला
अथर्व ढगे हा एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मुलगा असून आपल्या आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याला एक विवाहित बहीण असल्याचे सांगण्यात आले आहे. अथर्व याने यापूर्वी अंबाजोगाई येथील एका ट्रॅक्टर शोरूममध्ये काम केले असून. मुलाने स्वतःचा व्यवसाय करावा या उद्देशाने आई-वडिलांनी तीन महिन्यांपूर्वीच त्याला एक किराणा दुकान टाकून दिले असल्याचेही सांगण्यात येत आहे. किराणा दुकानाच्या माध्यमातून अथर्व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र, त्याच्या सोबत खूप वाईट झाले असून काळाने त्याच्यावर घाला घातल्याने त्याच्या परिवाराचा सहारा आता कायम निघून गेला आहे , अतिशय मनमिळाऊ मुलगा गेल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातांचं सत्र
या वळणावर या पूर्वी देखील अनेक अपघात झाले असल्याचे सांगण्यात येत आहे तर ओव्हरटेक करण्याच्या नादात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. लोखंडी सावरगाव परिसरात झालेल्या या अपघातामुळे रस्ते सुरक्षेचा आणि वाहन चालवताना घ्यावयाच्या काळजीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
