Nashik News: नाशिकरोडमधील जयराम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर रुग्णालयातील एका तरुण परिचारिकेने रुग्णालयातील निवासस्थानी आयुष्य संपवलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
परिचारिकांसाठी रुग्णालयाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर निवासव्यवस्था होती. तन्वी भदाणे हिने शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपली ड्युटी पूर्ण केली होती. तिच्या सहकारी परिचारिकांनी शनिवारी दुपारी सव्वाच्या सुमारास तिच्या खोलीचा दरवाजा उघडला असता तन्वी गळफास घेतल्याचे आढळले. तन्वीला तत्काळ खाली उतरवून उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
Nashik Accident: जागरण-गोंधळावरुन परतताना काळाचा घाला! पिकअपने घेतला पेट; नवदाम्पत्यासह चौघांचा होरपळून मृत्यू, 7 जण जखमी
तन्वीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून नाशिकरोड पोलिसांना माहिती देण्यात आली. तन्वीच्या मागे आई-वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे. तिच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजते.
Nashik Crime : नाशिक धर्मांतर प्रकरणातील HR आश्विनी चैनानीला पुण्यातून अटक, पीडिता तक्रार करताच जाणीवपूर्वक वाढवायचे वर्कलोड
तर दुसऱ्या एका घटनेत, बागलाण तालुक्यातील मुंजवाड गावात अठरा महिन्यांच्या शौर्य सूर्यवंशीचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सतीश धर्मा सूर्यवंशी यांचा मुलगा शौर्य सायंकाळी घराजवळ खेळत असताना उघड्या पाण्याच्या टाकीजवळ गेला. खेळता-खेळता त्याचा तोल जाऊन तो टाकीत पडला. बराच वेळ शौर्य दिसत नसल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोध सुरू केला. संशय आल्याने घराशेजारील टाकीत पाहिले असता तो पाण्यात आढळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुंजवाड गावासह संपूर्ण बागलाण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
