• Wed. Jun 17th, 2026
    Ashok Kharat: अशोक खरातची मानसिक स्थिती ढासळली; थेट मरणाची भाषा बोलू लागला, SIT समोर नेमकं काय घडलं?

    Nashik News: १३ एप्रिलपर्यंत अशोक खरात पुन्हा पोलिस कोठडीत असून, त्याला चिंचोक्यांचे खडे बनवून देणाऱ्या व्यावसायिकासह अनेकांची चौकशी सुरू आहे.

    अशोक खरात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा भोंदूबाबा संशयित अशोक खरातला विशेष तपास पथकाने (एसआयटी) अत्याचाराच्या तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली. खरातविरुद्ध तब्बल ‘१६० जीबी’ पुरावे संकलित झाले असून, त्याचे तीन ‘पेनड्राइव्ह’ एसआयटीच्या ताब्यात आहेत. यासह खरातचे सनदी लेखापाल (सीए) ललित पोफळे यांनी खरातविरुद्ध आठ कोटी रुपये फसवणुकीबाबत लेखी तक्रार केली. सक्तवसुली संचालनालयाने खरातचे तीन बँक खाते गोठविले आहेत.

    महिला अत्याचाराचे आठ गुन्हे, खंडणी, खासगी सावकारीसह फसवणुकीचे पाच व धमकावल्याचा एक असे एकूण चौदा गुन्हे नोंद असलेल्या संशयित खरातच्या कुकर्मांचा ‘पेनड्राइव्ह’ पोलिसांत सुपूर्द झालेल्या गुन्ह्याचा तपास आता सुरू झाला आहे. सरकारवाडा पोलिसांत अशोक खरातच्या ‘ऑफिस बॉय’ने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात खरातला एसआयटीने अटक केली.

    नाशिकरोडला चिंचोक्यांचे खडे

    खरात हा नाशिकच्या बाजारातून गावठी चिंचोके खरेदी करून नाशिकरोड येथील महेश कलंत्री या व्यावसायिकाला देत होता. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आला असून, खरातच्या कार्यालयातील ‘व्हिजिटर्स बुक’चाही तपास एसआयटीने सुरू केला आहे. शहरासह इतर ठिकाणच्या बाजारातून खरात शंभर रुपये किलो दराने मिळणारे रानटी चिंचोके खरेदी करायचा. हे चिंचोके कलंत्रीकडे जायचे. व्यावसायिक चिंचोके कापडाने घासून स्वच्छ करून त्याचे महागड्या खड्यांत रूपांतर करायचा. हेच बनावट खडे खरात मंत्रून दहा हजार ते एक लाख रुपये दराने विक्री करायचा, असे फिर्यादीत नमूद आहे.

    ‘मी इथेच मरणार…’

    सतत पोलिसांच्या चौकशीमुळे खरातची मानसिक स्थिती आता खालावली आहे. ‘मी इथून बाहेर पडेन असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे’, असे तो चौकशीदरम्यान बोलल्याचे समजते. खरातवर आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल आहेत. त्यांपैकी तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी खरात एसआयटीच्या पोलिस कोठडीत आहे. त्याने फसवणुकीसह लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची स्पष्टपणे कबुली दिलेली नाही. मात्र, काही मुद्द्यांवर त्याने पोलिसांना माहिती दिली असून, त्याची पत्नी कल्पना शिर्डी व सिन्नर पोलिसांच्या गुन्ह्यात पसार आहे.

    ‘शिजूका-नॉडी’ या एका नावाचे असंख्य फोन कॉल्स खरातच्या मोबाइलवर झाले आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. खरातने ‘शिजूका-नॉडी’चे नाव ठेवून लोकांना ‘मास्क’ केले. यामागे मोठे लोक आहेत, ‘इनकमिंग-आउट गोइंग’ आहे, असाही आरोप दमानियांनी केला. यासह रुपाली चाकणकरांचे १७७ पेक्षा जास्त कॉल्स असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला असून, एसआयटी तपासाबाबतही मुद्दे उपस्थित केले आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा