Pune Singhgad Crime News : अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डीजे तालावर नाचण्यावरून दोन वेगवेगळ्या गटांत वाद पेटला होता.
सिंहगड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढलंय. अशातच पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या हाणामारीत झालं. या हिंसक घटनेत एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृण मारहाण करून हत्या करण्यात आली आहे.
दोन गटात वाद झाला
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव शुभम राजू घोडके (वय 22) असं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डीजे तालावर नाचण्यावरून दोन वेगवेगळ्या गटात वाद पेटला होता. पुण्यातील आंबेगाव पठार आणि तुकाईनगर या दोन परिसरातील तरुणांच्या घोळक्यांमध्ये हा राडा झाला. तिथल्या स्थानिक परिसराच्या वर्चस्वाचा आणि जुना वाद डोक्यात धरून वाद आणखी पेटला.
Rohit Pawar : डॉक्टरांचा सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला, रोहित पवार यांनी दिली प्रकृतीबद्दल माहिती
शुभमवर अचानक हल्ला
वाद चांगलाच पेटल्यानंतर 10 ते 15 पोरांनी शुभमवर अचानक हल्ला चढवला. तब्बल 15 जणांच्या टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी आणि हातातील वस्तूंनी अत्यंत अमानुषपणे जबर मारहाण केली. या हल्ल्यात शुभम गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता सर्व 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘हा पठारावरचा आहे याला मारा’
शुभम जयंतीनिमित्त मिरवणूक पाहण्यासाठी सारसबाग इथे आला होता. मिरवणूक पाहून तो रात्री घरी परत जात होता. त्याच्याबरोबर त्याचा मेव्हणाही होता. ते वृंदावन नर्सरीजवळ थांबले असताना त्यांच्या भागातील टोळके तेथे आले. त्यांनी शुभम याला पाहिल्यावर ‘हा पठारावरचा आहे मारा याला’असं म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शुभम यांच्या मेव्हण्याने त्याला वाचविले. त्यानंतर आरोपी पळून गेले. शुभम व त्याचा मेव्हणा हे रिक्षाने घरी निघाले. वाटेत शुभम याला खूप त्रास होऊ लागला. तेव्हा त्याच्या घरच्यांना बोलावून शुभमला रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे उपचार सुरु असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम घोडके याचा मृत्यू झाला.
सिंहगड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तरुणाची हत्या
Pune Crime : आधी ‘सोडियम नायट्रेट’ मागवलं, नंतर ऑनलाईन माहिती घेतली, पिल्लाई कुटुंबाने स्वत:ची अखेर केली, घरात चिठ्ठी सापडली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेनं सूत्र हलवत कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत 5 अल्पवयीन आरोपींसह एकूण 10 जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सार्वजनिक कार्यक्रमात होणारी भांडणं हा देखील सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतायत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा