National Safe Motherhood Day 2026: माता-अर्भक मृत्यूंचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी एकत्रित व गुणवत्तापूर्ण उपचारांची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरवर्षी देशात तीन लाखांपेक्षा जास्त महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू होतो. यासोबतच सुमारे १८ लाख नवजात शिशूंचा पहिल्या एका महिन्यात मृत्यू होतो तर, २२ लाख अर्भक मृत जन्माला येत असल्याची माहिती एनएफएचएसच्या आकडेवारीवरून लक्षात येते. बालमृत्यूचा हा मोठा आकडा दिसत असला तरी दर सात सेकंदांत सातपैकी एकाचा होणारा मृत्यू रोखता येऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
Crime News : तरुणाच्या खिशातून हातचलाखीने iPhone 16 Pro काढला अन् निवांत निसटला, नागपूरच्या बस स्थानकावर थरारक चोरी
‘अर्भक मृत्युदरामागे कमी वजनाची बालके आणि प्रसूतीपूर्व मातेचे कुपोषण हे मुख्य कारण आहे. एनएफएचएसच्या आकडेवारीनुसार, आजही ५० टक्क्यांहून अधिक गरोदर महिला अॅनेमिक (रक्तात लोहाची कमतरता असणाऱ्या) आहेत. जोपर्यंत मातेचे आरोग्य सुधारत नाही, तोपर्यंत नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करणे कठीण आहे. सकस आहार आणि नियमित तपासणी यावर अधिक भर द्यायला हवा, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना काळबांडे म्हणाल्या.
Nagpur Crime: नागपुरात पोलीस बीट मार्शलवर विटेने हल्ला; मात्र जखमी अवस्थेतही आरोपीच्या मागे धावला, कामगिरीचं सर्वत्र कौतुक
‘गोल्डन अवर’मध्ये मिळावेत उपचार
मातामृत्यू रोखण्यासाठी प्रसूतीनंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेकदा ग्रामीण भागात अतिरक्तस्रावामुळे मातांचा मृत्यू होतो. जर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावरच रक्त संक्रमणाची सोय आणि तज्ज्ञ भूलतज्ज्ञ उपलब्ध असतील तर, अनेक जीव वाचवता येतील. केवळ रुग्णवाहिका पुरवणे पुरेसे नाही, तर रुग्णालयातील उपचारांचा दर्जा सुधारणे ही काळाची गरज आहे, असे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अंजली भांडारकर यांनी संगितले.
