• Sat. Jun 6th, 2026
    Pune Crime : पुणे खंडणी प्रकरण; रीलस्टार सोनाली हिंगेसह दोघं पोलीस कर्मचारी निलंबित, तपासात नवे धागेदोरे उघड

    Sonali Hinge : ‘रील स्टार’ सोनाली हिंगे हिचा वापर करून विश्वास संपादन करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हा कट अधिकच धक्कादायक ठरतो. या प्रकरणातील ‘रील स्टार’ पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांना निलंबित करण्यात आले आहेत.

    पुणे रीलस्टार सोनाली हिंगे निलंबित(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडवणाऱ्या खंडणी प्रकरणात आता नवे आणि अधिक गंभीर पैलू समोर येऊ लागले आहेत. ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिच्यासह दोघं पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास आता वेगळ्याच दिशेने वळल्याची माहिती समोर येत आहे.

    १० लाख रुपयांची मागणी

    मिळालेल्या माहितीनुसार, एका महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या प्रकरणात सुरुवातीला मदतीच्या उद्देशाने पोलिसांचा सहभाग झाला होता. मात्र, त्यानंतर या प्रकरणाचा वापर दबाव टाकण्यासाठी आणि आर्थिक फायदा मिळवण्यासाठी झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तक्रारीनुसार, प्राचार्यांवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून दबाव टाकण्यात आला आणि १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सात लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरली गेली का, याचा तपास आता अधिक खोलवर केला जात आहे.
    Maharashtra TimesJalna Crime : घरासमोर झोपलेला असताना अज्ञातांकडून हल्ला, मध्यरात्री तरुणाला निर्घृणपणे संपवलं; घरातल्यांना थांगपत्ताही नाही

    नवीन कॉल रेकॉर्ड्स

    दरम्यान, तपासात काही नवीन कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार आणि अंतर्गत संवाद यावरही लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ ब्लॅकमेलपुरते मर्यादित नसून, यामागे आणखी मोठे नेटवर्क आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात आरोप गंभीर स्वरूपाचे आढळल्यानंतर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील अंतर्गत कार्यपद्धती, अधिकारांचा वापर आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    Maharashtra TimesNagpur Crime : संसारासाठी खूप त्रास सहन केला, पण हळूहळू सना पूर्णपणे खचली; लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत जीवन संपवलं, सुखी आयुष्याची आस अधुरीच राहिली

    छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर

    पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आज घडलेल्या हेलिकॉप्टर लँडिंगच्या प्रकारावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका मांडत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. ‘हा अपघात नाही, आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही,’ असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा