Jalna Youth Murder in Midnight : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जालना तालुक्यातील सिरसवाडीमध्ये एका तरुणाची घरासमोर झोपलेला असताना हत्या करण्यात आली आहे.
सिरसवाडी झोपेत तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : जालना तालुक्यातील सिरसवाडी येथे एक मोठी घटना समोर आली असून, शेतवस्तीत घरासमोर झोपलेल्या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
घरासमोर झोपलेला असताना वार
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल वाघमारे (वय २५) असं मृत तरुणाचं नाव आहे. तो जालना तालुक्यातील सिरसवाडीयेथे काल शुक्रवारी रोजी रात्री ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील घरासमोर झोपलेला असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केल्यामुळे निखिल गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं.Nagpur Crime : संसारासाठी खूप त्रास सहन केला, पण हळूहळू सना पूर्णपणे खचली; लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत जीवन संपवलं, सुखी आयुष्याची आस अधुरीच राहिली
मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. हल्ल्याचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून, वैयक्तिक वैर किंवा अन्य कारणांमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Satara Crime : ‘त्याला जिवंत ठेवणार नाही’; मुलीशी चॅटिंग-भेटीचा राग, वडील-भावांनी 18 वर्षीय तरुणाला पित्यासमोरच संपवलं
पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात
दरम्यान, या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची माहिती गोळा केली जात आहे. तर एकासंशयित इसमालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, निखिल वाघमारे या तरुणाचा इतक्या निर्दयीपणे हत्या कोणी व का केली? याचा प्रश्न सध्या गावकऱ्यांना पडला असून पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन सत्य बाहेर आणावे, अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सिरसवाडी गावात शोककळा पसरली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. पोलीस घटनेसंदर्भात पुढील तपास करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा