• Sat. Jun 6th, 2026
    प्रेमसंबंधांना विरोध, ‘पोक्सो’त अटक; सागर ठाकरेने टीशर्टने पोलीस कोठडीत जीव दिला, कुटुंबाला भरपाई मिळणार

    Sagar Thakare Police Custody Death : सागरने अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यातील कोठडीत असताना १९ ऑगस्ट २०२१ रोजी जीव दिल्याची माहिती राज्य मानवाधिकार आयोगाला कळवण्यात आली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : ‘आरोपी पोलिस कोठडीत असताना त्याची सुरक्षितता व त्याचे संरक्षण, याची जबाबदारी ही संबंधित पोलिसांवर असते. सागर ठाकरे या तरुणाला सुरक्षित कोठडीत ठेवण्यात संबंधित पोलिसांना अपयश आले. सरकारी सेवकाच्या हलगर्जीने नागरिकाच्या मूलभूत हक्काचा अशाप्रकारे भंग झाल्यास राज्य सरकारवर जबाबदारी असते’, असे निरीक्षण नोंदवत राज्य मानवाधिकार आयोगाने सागरच्या कुटुबीयांना एक लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

    ठाकरे कुटुंबाला भरपाई मिळणार

    ‘आदेशाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवड्यांत सागरच्या कुटुंबीयांना एक लाखाची भरपाई द्यावी. अन्यथा ती रक्कम प्रत्यक्षात दिली जाईपर्यंत त्या रकमेवर वार्षिक आठ टक्के दराने सरळ व्याज लागू होईल. या आदेशाची प्रत आयोगाच्या सचिवांनी गृह विभागाचे संबंधित नोडल अधिकारी, राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (नागरी हक्कांचे रक्षण) आणि पोलिस विभागाचे नोडल अधिकारी यांना पाठवावी’, असेही आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर व सदस्य संजय कुमार यांच्या खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
    Maharashtra TimesDosa Batter Death : आईच्या दुधावाटे विषबाधा पसरत नाही, मग चिमुरड्या राहाचा जीव कसा गेला? डॉक्टरांची टिप, डोसा मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं

    काय आहे प्रकरण?

    सागरने अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यातील कोठडीत असताना १९ ऑगस्ट २०२१ रोजी जीव दिल्याची माहिती आयोगाला कळवण्यात आली होती. ‘सागरला पोक्सो गुन्ह्यात अटक झाली होती. त्याच्या प्रेमसंबंधाला दोन्ही बाजूंनी विरोध होता. अशा कौटुंबिक व वैयक्तिक कारणांमुळे मानसिक तणावाखाली त्याने पूर्वीही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. कोठडीत असताना त्याने जीवनयात्रा संपवल्याचे सीसीटीव्ही दृश्यांतून स्पष्ट होते’, असा अहवाल अमरावती सीआयडी उपपोलिस अधीक्षकांनी दिला.

    एकनाथ शिंदेंवर विडंबन गीत, हक्कभंग समिती समोर कुणाल कामराची हजेरी; नेमकं काय घडलं?

    सोबतच्या आरोपीचा जबाब

    तर, कोठडीत सोबत असलेला अन्य आरोपी आणि अन्य संबंधित अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवून न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपला अहवाल दिला. ‘पहाटे उठलो तेव्हा सागर जागा होता. नंतर पोलिसाने मला उठवून सांगितले की, तुझ्या लाल शर्टचा वापर करून सागरने जीव दिला’ असे सोबतच्या आरोपीने सांगितले. सीसीटीव्ही दृश्ये आहेत. कुटुबीयांनीही अत्याचारासारखा संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद नसून जीव दिल्याने झालेला आहे’, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशीअंती अहवालात नोंदवला.
    Maharashtra TimesKolhapur News : माझ्या बाळाची चिरफाड करु नका; अन्वीकचा दारात खेळताना मृत्यू, आरती ताईंनी पोस्टमार्टम थांबवलं, जुळी बहीण कावरीबावरी
    अखेरीस, ‘कोठडीत असताना आरोपीची सुरक्षितता व त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित पोलिसांवर असते. या प्रकरणात संबंधित सर्व पाच पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयश आले’, असे निरीक्षण आयोगाने आपल्या आदेशात नोंदवले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा