Thane News: ठाण्यात मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. शहरातील अनेक भागांत या जलवाहिनीनी पाणी पुरवठा होत असल्यामुळे दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांचा पाणीुरवठा बंद राहणार आहे. ऐन उन्हाळ्यात वीकेंडवर पाणटंचाईचं संकट आल्यामुळे ठाणेकरांचं टेन्शन वाढलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील माजिवडा जंक्शन येथील मुख्य जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. ही गळती रोखण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी शनिवार, ११ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते रविवार, १२ एप्रिल सकाळी नऊ वाजेपर्यंत २४ तास ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
गळती रोखण्यासाठी जलवाहिनी दुरुस्ती
या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत मुंब्रा, खारेगाव, कळवा, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बसस्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा, राबोडी एक व दोन, आकाशगंगा, बाळकुम, लोढा अमारा, ब्रह्मांड, गोकुळनगर, आझादनगर, लोकमान्य नगर, इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुना गाव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा, ज्ञानेश्वरनगर परिसर, किसननगर ३ परिसर, पोलिस लाइन, खारकर आळी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकरनगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंतविहार, लोकपुरम, लोकउपवन, देवदयानगर परिसर, कोकणी पाडा, शिवाईनगर, गावंडबाग, नीळकंठ, शास्त्रीनगर क्र. १ व २, लक्ष्मीबाग, विहंग पार्क, मैत्री पार्क, सिद्धांचल कॉम्प्लेक्स, वसंत विहार म्हाडा, वसंतविहार, माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकाळी, मनोरमानगर, रुणवाल, डोंगरपाडा, विजयनगर, विजय पार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासार वडवली, वर्तकनगर परिसर, चिरागनगर, दोस्ती कॉम्प्लेक्स, वागळे एमआयडीसी परिसर आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.Pune Water Cut: पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! कमी पावसाच्या शक्यतेमुळे 15 टक्के कपात; काही महिने नागरिकांना फटका
माजिवडा जंक्शन सेवा रस्ता बंद
या कामासाठी गोल्डन डाइज माजिवडा जंक्शन येथील सेवा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना दुरुस्तीकामामुळे होणाऱ्या कोंडीचा फटका बसणार आहे.
Goregaon-Mulund Link Road: लिंक रोडच्या कामांमुळे रहिवासी, वाहनचालकांच्या जीवाला धोका; सुरक्षा उपायांकडे काणाडोळा केल्याचा महापालिकेवर आरोप
घाटकोपरचा पाणीपुरवठा उद्या पूर्ववत
घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्यांच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे, १० एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. दुरुस्तीपूर्वी असलेल्या वेळाप्रमाणेच पाणीपुरवठा होणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील पाच दिवस पाणी उकळून पिण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा