• Sun. Aug 2nd, 2026
    Devendra Fadnavis : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, देवेंद्र फडणवीस यांच्या काकांचं मोठं वक्तव्य

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माझा पुतण्या आज ना उद्या देशाचा पंतप्रधान होईल, असं बाळासाहेब फडणवीस म्हणाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती आहे, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल”, असं बाळासाहेब फडणवीस म्हणाले आहेत. पुण्यात देवाभाऊ नावाच्या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस उपस्थित होते. बाळासाहेब फडणवीस यांनी यावेळी पुतणे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केले. तसेच आगामी काळात देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान बनतील, असा विश्वास व्यक्त केला.

    खरंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप पक्षातील महाराष्ट्रातील सध्याच्या घडीचे सर्वोच्च नेते आहेत. ते राज्याच्या राजकारणातील ताकदवान नेता आहे. त्यांनी तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून राजकीय विश्लेषकांकडून पाहिलं जातं. आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत फडणवीस हे एनडीएचे पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतात, अशी चर्चा सातत्याने सुरु असते. या चर्चांनंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांच्या काकांनी अशाच पद्धतीचं वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

    बाळासाहेब फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    “देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा निवडून आला. खरोखरच इतक्या लहान वयात मला नाही वाटत इतिहासात कुणी यशस्वी झालं असेल. तसा माझ्या पुतण्या अतिशय धीरगंभीर आहे. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही. तर कुटुंबाच्या गोष्टी करतो. त्यावेळेस तो अतिशय मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या खरोखर आज ना उद्या भारताता पंतप्रधान असेल, असं मला वाटतं. होऊ शकतो”, असं वक्तव्य बाळासाहेब फडणवीस यांनी केलं.

    फडणवीसांकडे दैवी शक्ती, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

    चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. “मुख्यमंत्र्यांना दैवी शक्ती मिळाली आहे. कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. तो संघटकही असतो, तो राज्यकर्ताही असतो, तो मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, तो लिहितोही प्रचंड, तो कुटुंबवत्सल आहे. आपल्या एकेक कुटुंबातील सदस्याच्या आयुष्यातील घटना लक्षात घेऊन तो अभिनंदन आणि सांत्वन करत असतो. हे सर्व एका माणसात सापडणं अवघड असतं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

    चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता ठाकरेंवर घणाघात

    मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत असताना चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “मी एक मुख्यमंत्री असे पाहिले, मी नाव न घेता वर्णन केलं तरी तुम्हाला कळेल. त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेल्यानंतर ते पहिले पेन काढायचे, मग निवेदन उघडायचे, ते निवेदन वाचायचे. निवेदनात पेनाने काही खुणा करायचे. आपल्याला वाटायचं, ते आपलं निवेदन व्यवस्थित वाचत आहेत. खुणा करत आहेत. आता ते लगेच काम करायला घेतील. पण ते पेन बंद करायचे आणि पुन्हा खिशात घालायचे. त्यानंतर म्हणायचे की, मी नंतर सांगतो तुला. असं ते साधारणत: 100 पैकी 99 लोकांना सांगायचे. त्यांचं नाव सांगू नका”, असा टोला त्यांनी लगावला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा