Sonali Hinge : ‘रील स्टार’ सोनाली हिंगे हिचा वापर करून विश्वास संपादन करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हा कट अधिकच धक्कादायक ठरतो.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील पोलिस दलाला हादरवून सोडणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला प्राचार्याला गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत तब्बल ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप थेट पोलिसांवरच झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील कर्मचारी तसेच सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. आरोपींनी अत्यंत धूर्त पद्धतीने महिला प्राचार्याला लक्ष्य केले. ‘POCSO’ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.
सात लाख उकळले
भीतीच्या छायेत असलेल्या पीडितेकडून आरोपींनी टप्प्याटप्प्याने तब्बल ७ लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारात ‘रील स्टार’ सोनाली हिंगे हिचा वापर करून विश्वास संपादन करण्यात आल्याचीही चर्चा आहे, ज्यामुळे हा कट अधिकच धक्कादायक ठरतो. Pune Water Park Accident : वॉटर स्लाईडवरुन घसरताना अपघात, पुण्यात 37 वर्षीय महिला गंभीर जखमी, मॅनेजमेंटची एक चूक अंगलट
तीन पोलीस अडकले
सध्या अजित बडे हे सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या तिघांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांचे प्रयत्न, सपकाळांना विनंती, काँग्रेसचा उमेदवार माघार घेणार?
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसच खंडणीखोरीत सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. आता या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे. Dosa Batter Death : आईच्या दुधावाटे विषबाधा पसरत नाही, मग चिमुरड्या राहाचा जीव कसा गेला? डॉक्टरांची टिप, डोसा मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं
शिरुरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दुसरीकडे, शिरुर येथे एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीशी ओळखीचा गैरफायदा घेऊन युवकाने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्या नंतर तिला वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही दिवसांनी पीडित मुलीली प्रकृती खालावल्याने पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्या नंतर हा प्रकार समोर आला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा