• Sun. Jun 14th, 2026

    बडीशेप पावडर आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊ

    ByMH LIVE NEWS

    Apr 9, 2026
    बडीशेप पावडर आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊ

    ललीता पिल्लेवार

    उन्हाळ्यात ॲसिडिटी, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या पोटाच्या समस्या अधिक प्रमाणात अनेकांना होत असतात. उष्ण हवामान आणि अनहेल्दी खाण्याच्या सवयी यांचा पोटाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की उन्हाळ्यात सत्तू खाल्ल्याने किंवा त्याचे पाणी प्यायल्याने पोट थंड राहण्यास मदत होते. पण याव्यतिरिक्त तुम्ही बडीशेप पासून बनवलेल्या सरबताचे सेवन सुद्धा पोट शरीर थंड करण्यास मदत करते. कारण यात थंडपणा देणारा गुणधर्म आहे आणि बडीशेपचे सेवन पचनासाठी गुणकारी मानले जाते. म्हणूनच बहुतेक लोकं जेवणानंतर एक चमचा बडीशेप आणि थोडी साखर खातात.

    बडीशेपमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते आणि त्यात आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. निरोगी पोट राखणे हा याचा सर्वात मोठा फायदा आहे. हे पोटासाठी कसे वरदान आहे आणि त्याच्या पावडरमधून तुम्हाला इतर कोणते आरोग्य फायदे मिळू शकतात हे जाणून घेऊयात.

    बडीशेपच्या बियांमधील पोषक तत्वे

    बडीशेपमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. फायबर व्यतिरिक्त त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. हा व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे, त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हे केवळ पोटासाठीच फायदेशीर नाही, तर चयापचय क्रिया वाढवत असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. याचे नियमित सेवन केल्याने भूक नियंत्रित ठेवण्यास आणि वजन सुधारण्यास मदत होऊ शकते.

    बडीशेप पोट थंड कसे ठेवते

    आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, बडीशेपमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आपल्या आतड्यांना फायदा होतो. जर एखाद्या व्यक्तीच्या आतड्यांचे आरोग्य बिघडते तेव्हा अनेकदा गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो. आयुर्वेदांच्या मते बडीशेपमध्ये दाहशामक गुणधर्म आहेत जे आतड्यांमधील सूज कमी करतात. खरं तर, उन्हाळ्यात जास्त तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने यकृत, पोट आणि आतड्यांना नुकसान पोहोचू शकते आणि यामुळे पोटात अतिरिक्त उष्णता देखील वाढू शकते.

    बडीशेप उष्णता कमी करण्यासाठी प्रभावी आहे कारण तिचा थंड गुणधर्म आहे. याव्यतिरिक्त आपण पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खावेत. आपल्या रोजच्या आहारात कलिंगड, काकडी, मुळा आणि खरबूज यांचा समावेश करा.

    आले आणि बडीशेप यांचे मिश्रण

    डॉ दररोज योग्य प्रमाणात आले आणि बडीशेपचे पाणी पिण्याची शिफारस करतात. या दोन्हींमुळे पचनक्रिया सुधारते. आले आतड्यांमधील अन्नप्रवाहाला गती देते, ज्यामुळे पोट फुगणे आणि अपचन टाळता येते. तर, बडीशेपमधील फायबरमुळे दुप्पट फायदे मिळतात. तुम्ही खडीसाखर आणि बडीशेपपासून पावडरसुद्धा बनवू शकता. ही पावडर बनवण्यासाठी बडीशेप आणि खडीसाखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

    रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा झोपण्यापूर्वी ही पावडर एक चमचा पाण्यातून घ्या. व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता.

    बडीशेपच्या बियांचे पाणी

    तुम्हाला जर पोटाच्या विकारांचा खूप त्रास होत असेल तर तुम्ही बडीशेपचे पाणी बनवून पिऊ शकता. झोपण्यापूर्वी एक चमचा बडीशेप पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी ते प्या. यामुळे पोटातील एन्झाइम्स सक्रिय होतात आणि पचनक्रिया सुधारते. तुम्ही भिजवलेली बडीशेप नाश्त्यामध्ये घेऊ शकता. तथापि, ती थेट चावून खाणे देखील सर्वोत्तम आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed