BMC News: संपूर्ण प्रकल्प मे, २०२७ पर्यंत पूर्ण होईल. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ दिली जाणार नाही, असे आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले.
मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार! पुढील वर्षी मेपर्यंत शहरात काँक्रीट रस्ते(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी रस्त्यांचे सिमेंट-काँक्रीटीकरण करण्याचा प्रकल्प दोन टप्प्यांत हाती घेण्यात आला आहे. त्यातील पहिला टप्पा डिसेंबर, २०२६पर्यंत, तर दुसरा टप्पा मे, २०२७पर्यंत पूर्ण होणार आहे. या कामाला सध्या गती दिली जात असून पावसाळ्यात मात्र कोणतेही काम सुरू राहणार नसल्याचे मुंबई महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी रस्तेकामांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह रस्ते विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते. रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या दोन टप्प्यांतर्गत २ हजार ११८ रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. यापैकी १ हजार १७० रस्त्यांचे संपूर्ण लांबीचे (एण्ड टू एण्ड) काँक्रीटीकरण, तर ५५९ रस्त्यांचे जंक्शन ते जंक्शन सिमेंट-काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा समावेश आहे. आत्तापर्यंत ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३८९ रस्त्यांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
आपल्या परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे, महापालिकेच्या कोणत्या अभियंत्याकडे संबंधित रस्त्याची जबाबदारी आहे, त्या दोघांचे नाव आणि संपर्क क्रमांकासह सविस्तर माहिती ‘डॅश बोर्ड’वर उपलब्ध आहे. त्यामुळे कंत्राटदाराशी आणि जबाबदार महापालिका अधिकाऱ्याशी थेट संवाद साधता येणार आहे. याशिवाय नागरिकांना माहिती हवी असलेल्या रस्त्याच्या कामांची सद्यस्थिती थेट जाणून घेता येणार आहे. ‘डॅश बोर्ड’च्या होमपेजवरच उजवीकडील रकान्यात नागरिकांना तक्रार नोंदविण्याची सोय आहे.
या ठिकाणी नागरिकांनी ‘क्लिक’ केल्यावर समोर एक अर्ज येतो. या तक्रार अर्जावर नागरिकांनी आपले नाव (ऐच्छिक), संपर्क क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप सादर करणे गरजेचे आहे.
खड्डे दुरुस्तीवरील खर्चात मोठी कपात
रस्ते काँक्रीटीकरणासंदर्भात मंगळवारी आमदार अमित साटम आणि महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आदींसोबत बैठक झाली. बैठकीनंतर साटम यांनी, रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे सांगितले. सन २०२३–२४मध्ये हा खर्च २०२ कोटी रुपये होता. तो २०२४-२५मध्ये १५६ कोटी रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजे त्यात २३ टक्के घट झाली. २०२५-२६मध्ये हा खर्च आणखी कमी होऊन ८९ कोटी रुपये झाला, म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत ४३ टक्के घट झाली.
चालू वर्षासाठी खड्डेदुरुस्तीचा निविदा खर्च सुमारे ४४ कोटी रुपये अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा