• Sat. Jun 6th, 2026

    Nagpur News : 200 सीसीटीव्ही, अनेक गाड्यांची झडती, चोराच्या मनात चांदणे, धावला अन् अडकला, पोलिसांची सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या

    Nagpur News : 200 सीसीटीव्ही, अनेक गाड्यांची झडती, चोराच्या मनात चांदणे, धावला अन् अडकला, पोलिसांची सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या

    नागपूर लोहमार्ग पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा एक विद्यार्थी आहे. पण ऑनलाइन जुगारात पैसे गमावल्याने तो ट्रेनमध्ये चोरी करु लागला. अशाच एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी 200 सीसीटीव्ही चेक केले आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : ऑनलाइन बेटिंगमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे एका तरुणाने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेमधील तब्बल 22.70 लाख रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीचा यशस्वी छडा लावला आहे. नांदेड येथील 23 वर्षीय व्हेटरनरी शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित मारोती दुय्येवार याला अटक केली आहे. ही घटना 29 मार्चला पहाटे नागपूर रेल्वे स्थानकावर घडली होती. रायपूर येथील हरिशचंद चंदवाणी हे आपल्या कुटुंबासह बिकानेर एक्सप्रेसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या पत्नीने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स डोक्याखाली ठेवून झोप घेतली होती. गाडी नागपूर स्थानकावर थांबलेली असताना आरोपीने त्यांच्या झोपेचा फायदा घेत पर्स चोरून नेली. काही वेळाने ती पर्स बाथरूममध्ये रिकामी अवस्थेत आढळून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.

    घटनेची माहिती मिळताच नागपूर लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. या प्रकरणात 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान एक संशयित व्यक्ती चोरी करून स्टेशनबाहेर जाताना दिसून आली. त्यानंतर रॅपिडो बुकिंगमधून मिळालेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यामधून आरोपी नांदेड येथील असल्याचे स्पष्ट झाले.

    पोलिसांनी आरोपीचा शोध नेमका कसा घेतला?

    पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी नांदेडहून नागपूरकडे ट्रॅव्हल्सने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. नांदेड नागपूर मार्गावरील 9 ते 10 ट्रॅव्हल्स तपासण्यात आल्या. अखेर रहाटे कॉलनी परिसरात संशयित दिसताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रोहित दुय्येवार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 17.43 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे.

    तपासात आरोपी हा उच्चशिक्षित असून नागपुरात व्हेटरनरी डॉक्टरचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन बेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्यामुळे त्याने चोरीचा मार्ग अवलंबल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणामुळे तरुणांमध्ये वाढत चाललेल्या ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाबाबत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीला न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा