Panvel Railway Station: पनवेल रेल्वे स्थानकावर 23 फेब्रुवारीपासून अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. एसी लोकलच्या विलंबामुळे आधीच स्थानकावर गर्दी होत होती. त्यात या ट्रेनमुळे गर्दी वाढली असून लोकल प्रवाशांना 6ास सहन करावा लागत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पनवेल रेल्वे स्थानकांत अमृतभारत या पश्चिम बंगाल आणि आसामकडे जाणाऱ्या गाडीसाठी दर सोमवारी मोठी गर्दी होते आहे. सकाळी 12 वाजताच्या सुमारास स्थानकांत चेंगराचेंगरी होवू शकते अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
मजुरांची मोठी गर्दी
पनवेल रेल्वे स्थानकातून प्रत्येक सोमवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी अमृत भारत ही रेल्वेगाडी सुटते. 23 फेब्रवारी पासून सुरू झालेल्या रेल्वेमुळे सध्या महाराष्ट्रात काम करणारे मजुर या गाडीतून प्रवास करतात. तिकिट काढण्यासाठी अनेक मजूर पहाटेपासूनच स्थानकावर जमा झालेले असतात. त्यामुळे तिकीट खिडकीवर देखील प्रवाशांची गर्दी असते. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पनवेल रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचे काम सध्या सुरू आहे.Panvel Railway Station: ‘एसी’मुळे सामान्य लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, पनवेल रेल्वे स्थानकावरील भार वाढला; दररोज प्रवाशांची गर्दी
भविष्यात पनवेल जंक्शन म्हणून विकसित होईल. परंतू अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा त्रास सध्या तरी प्रवाशांना करावा लागतो आहे. दर सोमवारी लोकल प्रवाशांच्या गर्दीसोबत गर्दीच्या वेळेतच ही गर्दी होत असल्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची भिती प्रवाशांना वाटते आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी होवू नये म्हणून नियोजन करण्याची गरज आहे अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
“पनवेल रेल्वे स्थानक दर सोमवारी भयभित करणारी गर्दी तयार होते आहे. ही गर्दी पांगविण्यासाठी नियोजनाची गरज आहे. अन्यथा चेंगराचेंगरी होवून जिवितहानी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे,” असे गणेश सुतार नावाच्या प्रवाशाचे म्हणणे आहे.
टर्मिनल तयार होताच गर्दी वाढण्याची भीती
सध्या पनवेल स्थानकावर सहा तिकीट काऊंटर आणि 15 स्वयंचलित मशीन आहे. तरीही तिकीट खिडकीवर प्रवाशांचा दर सोमवारी रांगा लागतात. पनवेल स्थानक टर्मिनल बनल्यानंतर दररोज अशा गाड्या सुटू लागणार. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढून स्थानकावरील गर्दी वाढण्याची चिंता आहे. सध्या पनवेल स्थानकाला टर्मिनल बनवण्यासाठी स्थानकांचा विस्तार सुरू आहे. हे काम पूर्ण झालं तरी तिकीट काऊंटरची संख्या जर वाढली नाही तर गर्दी आणखी वाढणार आहे. आता केवळ एका गाडीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण होत असेल तर दिवसाला दोन-तीन ट्रेन सुटू लागल्यावर ही समस्या वाढणार आहे.
Navi Mumbai News: ‘जेएनपीए’ला जोडणाऱ्या पुलाजवळील मार्ग खचला, जोडरस्त्यासाठी 68 कोटींचा खर्च; 8-10 महिन्यांत प्रकल्पाची दुर्दशा पनवेल रेल्वे स्थानकावर ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांसह पेण आणि रोहाच्या दिशेने जाणारे प्रवासीही असतात. या एक्सप्रेस ट्रेन दाखल होताच रेल्वे स्थानकावरही गर्दी निर्माण होते. त्या एसी लोकल सुरू झाल्यामुळे ही गर्दी अजून वाढली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा