• Sun. Jun 14th, 2026

    Pune News: पुण्यातील 12 ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांना गती, बाणेर-पाषाण लिंक रोड पूर्ण होणार; 30 वर्षांपासून रखडलेला मार्ग अंतिम टप्प्यात

    Pune News: पुण्यातील 12 ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांना गती, बाणेर-पाषाण लिंक रोड पूर्ण होणार; 30 वर्षांपासून रखडलेला मार्ग अंतिम टप्प्यात

    Baner-Pashan Link Road: बाणेर-पाषाण लिंक रस्त्याला 1992मध्ये मान्यता मिळाली होती. त्यानंतर 2014मध्ये या मार्गाचं बांधकाम सुरू झालं होतं. परंतु, केवळ 200 मीटर जमिनीचं भूसंपादान रखडल्याने कित्येक वर्ष हा मार्ग पूर्ण झाला नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी,पुणे: बाणेर-बालेवाडी आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा बाणेर-पाषाण लिंक रस्ता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तीन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पातील केवळ २०० मीटरचा भाग रखडलेला आहे. तो पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

    केवळ 200 मीटर भाग रखडला

    सुमारे १.२ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी भूसंपादनाच्या अडचणींमुळे मधला महत्त्वाचा भाग रखडला होता. सन १९९२मध्ये मंजूर झालेल्या या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सन २०१४मध्ये सुरू झाले. मात्र, भूसंपादनातील गुंतागुंत वाढत गेल्याने प्रकल्पाची गती मंदावली. महापालिकेच्या ‘मिसिंग लिंक’ योजनेत या रस्त्याचा समावेश आहे. शहरातील ३३ मिसिंग लिंकपैकी १२ रस्ते चालू वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अर्थसंकल्पीय आराखडा सादर करतानाच स्पष्ट केले होते. त्याचवेळी भूसंपादनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याचेही राम म्हणाले होते.Maharashtra TimesPune Weather: मान्सूनपूर्वीच पुण्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ, अवकाळीमुळे हवामान बदललं; 2016नंतर एप्रिलमधील नीचांकी तापमानाची नोंद

    या प्रकरणी सन २०२१मध्ये ‘बाणेर-पाषाण लिंक रोड वेल्फेअर ट्रस्ट’ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिकेला कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचा आदेश दिल्यानंतरही कामात विलंब झाल्याने एप्रिल २०२५मध्ये कठोर भूमिका घेऊन दोन महिन्यांत भूसंपादन आणि चार महिन्यांत रस्ता पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. भूसंपादनासाठी महापालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे २५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून, जमीन ताब्यात मिळाल्यानंतर काम तातडीने सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठीच कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    १६ गाड्यांना ‘एलएचबी’ कोच

    आझाद हिंद एक्स्प्रेस (कोल्हापूर), गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-अहमदाबाद एक्स्प्रेस, वेरावळ एक्स्प्रेस, भगत की कोठी एक्स्प्रेस, पुणे-भुज एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्स्प्रेस, पूर्णा एक्स्प्रेस, दरभंगा एक्स्प्रेस, नागपूर एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, धनबाद एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस, नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मंबई विशेष.

    Maharashtra TimesPune News: पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार, वर्षभरात सहा नवे फलाट उभारणार; टप्प्या-टप्प्याने कामं होणार

    रेल्वे प्रशासनाने १६ गाड्यांमधील पारंपरिक आयसीएफ (इंटिग्रल कोच फॅक्टरी) डब्यांचे अत्याधुनिक एलएचबी (लिंक हाॅफमन बुश) कोचमध्ये रूपांतर केले आहे. या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा