Nagpur Suchit Bhojapure Death Case : आर्यनने पुरावा नष्ट करणे व मृताची ओळख पटू नये, यासाठी ‘क्राइम पेट्रोल’ आणि गुन्हेगारी विश्वाशी संबंधित अन्य मालिका यूट्युबवर बघितल्या. त्यानुसार सुचितचे कपडे काढण्यात आले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : कारच्या मोहापायी सुचित उपासराव भोजापुरे (वय ४४, रा. बाबा त्रिमूर्ती सोसायटी, वाडी) यांचा दगडाने ठेचून खून केल्यानंतर अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांनी ‘क्राइम पेट्रोल’मधील मालिका पाहून त्याप्रमाणे सुचित यांची विवस्त्र बॉडी झुडपात लपवला, अशी धक्कादायक माहिती पुढे आली. आर्यन नरेश शेंडे (वय २२, रा. व्यंकटेश कॉलनी, नंदनवन) याने पोलिसांना ही बाब सांगितली. सुचित हत्याकांडाचा सूत्रधार आर्यनच असून, त्यानेच मित्रांना या कटात सहभागी करून घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे.
सुचित हत्याकांड प्रकरणात वाडी पोलिसांनी आर्यन, रिशांख तारेश कांबळे (वय २०, रा. शिल्पा सोसायटी, बेलतरोडी) व अनुज रमेश वाघमारे (वय १९, रा. हिवरीनगर), या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी तिघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची मंगळवार, ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
काय आहे प्रकरण?
गुरुवारी सकाळी सुचित हे वर्धमाननगरमधील उड्डाणपुलावर कारध्ये मद्यधुंद अवस्थेत होते. तिघांना ते दिसले. मदतीसाठी त्यांनी सुचित यांना विचारणा केली. तिघेही त्यांना आधी भिवापूरला घेऊन गेले. तेथून सायंकाळी ते वाडी येथे आले. घरी कोणी नसल्याने आर्यनने त्यांच्या हत्येचा कट आखला. Crime News : मी तुमच्यावर खूप प्रेम करते… पती प्रतिसाद देईना; चिठ्ठी लिहित 28 वर्षीय तरुणीने माहेरी आयुष्य संपवलं सुचित यांची हत्या केल्यानंतर त्यांची कार काही दिवस वापरू व कारची विक्री करू, विक्रीतून मिळालेले पैसे समान वाटून घेऊ, असे आर्यनने रिशांख व अनुजला सांगितले. दोघांनीही त्याला होकार दिला. त्यानंतर तिघेही सुचित यांना घेऊन लावा स्मशानघाटाजवळ गेले. तिथे दगडाने चेहऱ्यावर वार करून त्यांची हत्या केली.
अजित दादांची स्वप्न पूर्ण करायला तुमची गरज; बारामतीकरांसमोर जय पवार रडले
क्राईम मालिका पाहून पुरावे मिटवले
याचदरम्यान आर्यनने पुरावा नष्ट करणे व मृताची ओळख पटू नये, यासाठी ‘क्राइम पेट्रोल’ व गुन्हेगारी विश्वाशी संबंधित अन्य मालिका यूट्युबवर बघितल्या. त्यानुसार, सुचित यांचे कपडे काढण्यात आले. नग्नावस्थेत सुचित यांचं शव स्मशानघाटाजवळील झुडपात लपवलं. त्यांचे कपडे, दोन मोबाइल व अन्य साहित्य घेऊन कारसह तिघेही पसार झाले. केडीके कॉलेज परिसरात कार लपविली. ही घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक करून वाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्यांची मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा तपास वाडीचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन चरडे करीत आहेत. Crime News : लेकीने पळून लग्न केलं, बापाने माहेरी आणून जीव घेतला, पोस्टमार्टममुळे कांगावा उघड, पोलीसही अडकला
घटनाक्रमाचं प्रात्यक्षिक
पोलिस कोठडी घेतल्यानंतर पोलिसांनी अटकेतील आर्यन, रिशांख व अनुजला सोबत घेत सुचित हत्याकांडाच्या घटनाक्रमाचे प्रात्यक्षिक केले. सुरुवातीला तिघांनी सुचित यांचे कपडे विविध ठिकाणी फेकल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता कपडे कारमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कपडे व कार जप्त केली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा