सुषमा अंधारे यांनी अशोक खरात प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा सीडीआर रिपोर्ट समोर आणणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर कारवाईची मागणी केली. यासोबतच त्यांनी सीडीआरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचं नाव असल्याने त्यांचीदेखील चौकशी करण्याची मागणी केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सीडीआर रिपोर्ट समोर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर कारवाईची मागणी केली. यासोबतच सीडीआर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दीपक केसरकर यांची नावे आली आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
“अंजली दमानिया असं म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला 177 कॉल केले. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीने 236 कॉल अशोक खरातला केले. तब्बल 17 कॉल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले. ज्यातील 6 इनकमिंग आणि 6 आऊटगोइंग अशी संख्या त्यांनी सांगितली आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांचे काही कॉल आहेत. माझा दमानिया यांच्यावर आक्षेप आहेत. ते राहतीलच. दमानिया यांनी काहीही केलं तरी ते आक्षेप जाणार नाहीत”, अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली.
‘दमिानिया सांगत असणारी माहिती दुर्लक्षित करण्यासारखी नाही’
“माझी अडचण अशी आहे, मी आता दमानिया यांच्याकडे लक्ष द्यायला गेले तर मूळ मुद्दा बाजूला पडेल. त्यामुळे सीडीआर हे कसे काढले आणि कुणी काढले, याबाबत कारवाई झाली पाहिजे. दमानिया यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण दमानिया यांनी जी माहिती काढली आणि जी माहिती ते तीनवेळा सांगत आहेत, ती माहिती सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे त्या माहितीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे”, असं मत सुषमा अंधारे यांनी मांडलं.
‘एकनाथ शिंदेंची चौकशी करावी’
“ज्याने सीडीआर काढले, त्याची चौकशी व्हावी. पण ज्याचे सीडीआर निघाले आहेत त्यांच्या चौकशीचं काय? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं नाव दमानिया घेत असतील तर हे गंभीर आहे. एसआयटी ही हिंमत करणार आहे का? त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौकशी करावी”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“माझ्या अडचणी अशा आहेत की, ड्रग्जच्या प्रकरणात मी फार तीन वर्षांपासून भांडत आहे. पण त्यात अजूनही म्हणावा तसा तपास होत नाही. आता हे नवीन तंत्रमंत्र विद्येचं प्रकरण आलं आहे. ही अघोरी विद्या, तंत्रमंत्र प्रकरण महाराष्ट्राला 5 ते 25 वर्ष मागे नेणारं आहे. त्यामध्ये महिला आयोगाच्या एकेकाळच्या प्रमुख असलेल्या चाकणकरांचं नाव येत असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचं नाव येत असेल, तर हे गंभीर आहे”, असं अंधारे म्हणाल्या.
‘शिंदेंनी खरातला कॉल का केले?’, अंधारेंचा सवाल
“एकनाथ शिंदेंनी खरातला कॉल कशासाठी केले, का केले? याची चौकशी होणं गरजेचं आहे. ज्याने सीडीआर काढले त्याची चौकशी झालीच पाहिजे, पण ज्याचे सीडीआर निघाले त्यांचीदेखील चौकशी व्हावी. अंजली दमानिया यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल. तथ्य नसेल तर दमानियांवर कारवाई होईल. तर ते दुर्लक्ष होण्यासारखं नाही. एकनाथ शिंदे यांची चौकशी एसआयटी करणार आहे का? एसआयटी चांगले काम करत आहे. तरीही एसआयटीच्या तपासाच्या गतीबाबत मला नाईलाजाने प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. कारण मी कालही म्हटलं, माझ्यापर्यंत, अंजली दमानियांपर्यत माहिती पोहोचते तर ही सर्व माहिती एसआयटीपर्यंत का पोहोचत नाही?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
“पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो. ज्यांच्याबद्दल ही माहिती समोर येत आहे. 21 मिनिटांचे संभाषण झाले आहे. अतिशय महत्त्वाची नावे आहेत. एकनाथ शिंदे, दीपक केसरकर हे दुर्लक्षित करण्यासारखी नावे नाहीत. या नावांकडून कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे. तेव्हा या सगळ्या नावांची चौकशी होणं गरजेचं आहे. ते का होत नाही? चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावलेलं नाही. नाशिकच्या काही वरिष्ठ स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यातला समावेश, त्या पोलीस अधिकाऱ्यांचे इनपूट आम्ही एसआयटीला दिलेले आहेत. मात्र त्याही दृष्टीने कुठली सकारात्मक पावले पडलेली नाहीत हेही तितकंच खरं”, असं सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा