• Mon. Jun 15th, 2026

    Sunetra Pawar : ‘मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी’; सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

    Sunetra Pawar : ‘मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी’; सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

    सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरला. त्यापूर्वी केलेल्या भाषणात त्यांनाी बारामतीकरांना भावनिक आवाहन केले आहे. ‘गुंडागर्दीला थारा देणार नाही आणि दादांचा जनता दरबार सुरूच राहील’, अशी ग्वाही त्यांनी बारामतीकरांना दिली.

    सुनेत्रा पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बारामती: “आदरणीय अजित दादांचे जाणे ही केवळ माझी किंवा माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर ती संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्राची हानी आहे. बारामतीकरांच्या विकासासाठी आणि दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आहे आणि अत्यंत धीरानं तुमच्यासाठी बाहेर पडले आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

    यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांसह महायुतीचे अनेक दिग्गज नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

    “बारामती म्हणजे दादांचा श्वास”

    आपल्या भाषणाची सुरुवात करताना सुनेत्रा पवार यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले. “बारामतीत ही पोट निवडणूक होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. दादा आजही आपल्यात नाहीत हे मला मान्यच नाही. नियतीने हा कठीण काळ आपल्यावर आणला आहे,” असे त्या म्हणाल्या. बारामतीशी असलेल्या दादांच्या नात्याबद्दल बोलताना, “दादांसाठी बारामती म्हणजे आई सारखी होती. इथला प्रत्येक नागरिक हा त्यांच्यासाठी पांडुरंग होता. बारामतीमध्ये दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही याच मातीत विसावला,” असेही त्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesRohit Pawar : ‘अजितदादाच निवडणूक लढवत आहेत असं समजा’; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन

    “तुमची साथ हीच माझी शक्ती”

    सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, “गेल्या ३५-३६ वर्षांत तुम्ही दादांना नेहमीच प्रचंड मताधिक्याने निवडून दिले आहे. आज हा अर्ज भरताना मला जो धीर मिळाला आहे, तो केवळ तुम्हा बारामतीकरांकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा आणि तुमची साथ हीच माझी खरी शक्ती आहे.”

    “बारामतीचा विकास सुरु राहील’

    “बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. आता विकास थांबणार नाही याची खात्री बाळगा, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. महायुतीचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे. अजितदादांचा विचाराचा वारसा सांभाळात मी काम करीत राहील. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून म्हणून 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांचा विचार पुढे घेऊन जाते. जय पवार आणि पार्थ पवार हे माझं कुटुंब नाही. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अजितदादांचा जनता दरबार सुरू राहील. बारामतीचा विकास कायम सुरू राहील”, असेही यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा