• Sun. Jun 14th, 2026
    Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; नागभीड वनपरिक्षेत्रातील घटना

    Chandrapur Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

    वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतालगत एका नाल्याजवळ वाघाच्या हल्ल्यात एका ५८ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नागभीड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा नियतक्षेत्रालगत उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मागील सव्वातीन महिन्यांत मानव-वन्यजीव संघर्षात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    मिंथूर येथील रहिवासी हरिदास महादेव कुबडे हे शनिवारी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी आपल्या शेताकडे गेले होते. सायंकाळ होऊनही ते घरी परतले नाही. कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरु केला. रात्र झाल्याने शोध मोहिमेत अडथळा निर्माण झाला. रविवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने आणि ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम राबवली असता, शेताजवळील एका नाल्यालगत हरिदास यांच्या शरीराचे छिन्नविछिन्न अवशेष आढळून आले. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ओढत नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर मिंथुर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

    Maharashtra TimesChandrapur Farmer: किडनी विकलेल्या शेतकऱ्यानं मागितलं इच्छामरण; सावकारपीडित शेतकरी रोशन कुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
    मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात वाघाच्या हल्ल्यात ११ तर बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी; २०२५मध्ये वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये ४७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यापैकी वाघांच्या हल्ल्यांत ४२, बिबट्यांच्या हल्ल्यात तीन तर अस्वल आणि हत्तीच्या हल्ल्यांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता.

    Maharashtra TimesRaigad Crime : पतीच्या प्रेयसीने वाद, मार्ग काढण्यासाठी महिला भोंदूबाबाकडे, त्याचे मध्यरात्री विचित्र विधी करत महिलेसोबत अमानुष कृत्य
    सहा ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्हीची नजर
    परिसरात वाघाचा वावर वाढल्याचे लक्षात घेऊन वनविभागाने गस्त वाढवली आहे. सहा ट्रॅप कॅमेरे व एक सीसीटीव्ही लाइव्ह कॅमेरा लावण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली. दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची मदत देण्यात आली आहे. नागरिकांनी जंगलात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा