Devendra Fadnavis On Ashok Kharat Case: सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेला फडणवीस उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अशोक खरात प्रकरणाशी संबंधितांचा ‘सीडीआर’ आपल्याकडे असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. परंतु, असा ‘सीडीआर’ प्राप्त करून घेण्याचा अधिकार तपास यंत्रणा वगळता कुणालाही नाही. त्यामुळे त्याचीही चौकशी सरकार करेल. अशा संवेदनशील प्रकरणांत केवळ आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. कोण कोणाशी बोलले, कुणी कुणासोबत काय केले, या आधारावर गुन्हेगारी तपास यंत्रणांचे काम चालत नाही. सबळ पुरावे महत्त्वाचे ठरतात. खरात याने केलेल्या घाणेरड्या कृत्यांमध्ये जे सहभागी असतील, त्या कुणालाही आम्ही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Ashok Kharat: अशोक खरातसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने मानसिक धक्का; ८ ते ९ महिला मानसिक तणावात, उपचारही घेतले!
खरात प्रकरणात रोज नवीन माहिती पुढे येत आहे. ‘एसआयटी’ काय तपास करते हे रोज सांगता येणार नाही. परंतु, ही यंत्रणा उत्तम काम करीत असून, त्यावर सर्वांनी विश्वास ठेवावा. खरात प्रकरणाची सगळी पाळेमुळे खोदल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अशोक खरातची ईडी चौकशी
भोंदू अशोक खरात प्रकरणाची माहिती घेऊन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून चौकशी निश्चितपणे होईल. याशिवाय खरातच्या जमिनींबाबतची खातरजमा झाली की, नियमानुसार कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Ashok Kharat प्रकरणात ईडी सक्रीय होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, ‘कुणालाही सोडणार नाही’, फडणवीस काय-काय म्हणाले?
औरंग्याच्या थडग्याबाबत आपल्याला गर्व हवा
औरंगजेबाचे थडगे काढून टाका, अशी मागणी काही लोक करीत आहेत. ते संरक्षित स्थळ असून ‘आर्किलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या ताब्यात आहे. स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहिला. स्वराज्य तर नष्ट झाले नाही, पण त्याच औरंग्याचे थडगे महाराष्ट्रात तयार झाले. ज्या ज्या वेळी कुणी स्वराज्यावर व सनातनवर आघात करेल त्याचेही थडगे अशाच पद्धतीने तयार होईल, असे हे थडगे सांगत राहील. त्यामुळे याचा आपल्याला गर्व असला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
