Murder Case: भांडणात पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळाहून पती पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु दिघी सागरी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.
चारित्र्याच्या संशयातून वाद, तरुणाने २० वर्षीय पत्नीला दगडाने ठेचून संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड: चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील देवभूमी असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिघी इथं घडली आहे. या हत्येप्रकरणी दिघी सागरी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दिघी गावाच्या हद्दीतील नवगरे जंगल परिसरात आंबा बागायतीत राखणदार म्हणून काम करणारे किरण परशुराम वाघमारे (वय २५) आणि त्यांची पत्नी अनिता किरण वाघमारे (वय २०, दोघेही मूळ रा. सायगाव, वावडूंगी पोस्ट शिघे, ता. मुरुड, जि. रायगड) यांच्यामध्ये क्षुल्लक कारणांवरून सतत वाद होत असत. अनेकदा पती किरण हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे, तसंच तो तिला मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अशातच १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाच्या भरात किरण वाघमारे याने अनिताच्या कानावर, गालावर व डोक्यावर दगडाने जोरदार वार करत तिला गंभीर जखमी केले. अनिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.घटनेची माहिती मिळताच आंबा बागायत मालक जलील अहमद जैद यांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, आपल्या पत्नीला ठार केल्यानंतर आरोपी पती पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र दिघी सागरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्षद शेख करीत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा