• Sun. Jun 7th, 2026
    Pune Crime : पुण्यात स्मशान काली मंदिर परिसरात थरार; तीन भावंडांना बेदम मारहाण, नेमकं घडलं काय?

    पुण्यात स्मशान काली मंदिर परिसरात मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. उसने पैसे मागितल्याच्या रागातून मंदिर परिसरात तीन भावंडांना बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील स्मशान काली मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भावंडांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) हे ३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता आपल्या दोन भावांसह मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी आरोपी आतिफ, अझीम सलीम शेख उर्फ चोर, गौरव गुजर, पियूष परदेशी, रेहान उर्फ भैया तसेच इतर साथीदारांनी त्यांना अडवले.

    जुन्या पैशांच्या व्यवहारावरून आरोपींनी फिर्यादीशी वाद घातला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने वार केला. तसेच पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

    फिर्यादीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या दोन्ही भावांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्यांसह हत्यारांचा वापर करून तिघांनाही गंभीर जखमी करण्यात आले. घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी गौरव गुजर आणि रेहान उर्फ खिम्या यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात उसने पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून हा वाद उद्भवल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    पुण्यात याधीदेखील हाणामारीची घटना

    पुण्यात याआधीदेखील हाणामारीची घटना समोर आली होती. औंध परिसरातील इंदिरा गांधी वसाहतीत झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीने अचानक हिंसक वळण घेतल्याची घटना समोर आली होती. या घटनेत चार जण जखमी झाले असून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी परिसरात संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी फिर्यादीच्या वडिलांचा नाचताना आरोपींपैकी एकाला नकळत धक्का लागला. या छोट्याशा कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. मात्र काही क्षणांतच हा वाद चिघळला आणि आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

    हा प्रकार पाहून फिर्यादी कुणाल तुजारे (२२) आणि त्याचा पुतण्या यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. “का मारहाण करताय?” असा जाब विचारताच आरोपी अधिकच आक्रमक झाले. त्यांनी दोघांवरही हल्ला केल्याने परिस्थिती आणखी बिघडली. या झटापटीत एकूण चार जण जखमी झाले. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच परिसरातील पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा