Baramati News: बारामती येथे उमेदवार द्यायचा किंवा कसे, याचा निर्णय काँग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याचे राज्यातील इतर ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार देण्याचे निश्चित झाल्यानंतर आता या प्रश्नावरून महाविकास आघाडीतील फूट पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसने उमेदवार देण्याचे निश्चित केले असतानाच शिवसेना (उबाठा) पक्षाकडून मात्र या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी महाविकास आघाडीतील बेबनावची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार बारामती आणि राहुरी या दोन मतदार संघांतील पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. त्यासाठी भाजपकडून प्रयत्नही सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढणार आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी बुलडाणा येथे पत्रकारांशी बोलताना बारामतीत पक्षाकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे सांगितले.
सपकाळ यांच्या या विधानामागे येऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला विचारल्या- शिवायच शरद पवार यांनी शिवसेनेला उमेदवारी देऊ केल्याच्या विधानामुळे दुखावलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचा दबाव असल्याचेही बोलले जात आहे. महाविकास आघाडी म्हणून केवळ काँग्रेसनेच कायम त्याग करायचा व शिवसेना, राष्ट्रवादी (शप) यांनी कायम फायदाच घ्यायचा हे योग्य नसल्याचे राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. आयत्यावेळी दिल्लीहून हिरवा कंदील मिळाल्यास उमेदवारीसाठी घाई होऊ नये म्हणून काँग्रेसमधून काही नावांची चाचपणीही केली जात असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाने बारामतीबाबत अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. या संदर्भात पक्षाकडून लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी (शप) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी खलबते सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा