• Tue. Jun 16th, 2026
    Chandrashekhar Bawankule: बेगम, जहागीर जमिनी लवकरच फ्री होल्ड करणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

    Chandrashekhar Bawankule: माजी खासदार डॉ. वसंत पवार यांच्या जन्मदिनानिमित्त गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने आयोजित प्रेरणा दिन कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते.

    चंद्रशेखर बावनकुळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिकमध्ये ‘बेगम’, ‘जहागीर’ अशी नावे लावलेल्या अनेक जमिनी असून, त्या लवकरच ‘फ्री होल्ड’ केल्या जातील व त्या नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

    कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी (दि. ४) हा कार्यक्रम झाला. त्यात बावनकुळे यांनी ‘महसूल व सहकार’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी राज्य शासनाकडून घेतल्या जात असलेल्या काही निर्णयांची माहिती दिली. बेगम, जहागीर नाव लावलेल्या जमिनींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत चर्चा झाली. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.

    Maharashtra TimesDindori Accident : …तर दिंडोरी अपघाताची घटना घडली नसती, निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते, स्थानिकांचा नेमका आरोप काय?
    शेतीतील पाणंद रस्त्यांसाठी योजना सुरू केली असून, पुढील पाच वर्षांत हे सर्व रस्ते मजबूत होतील. जमीन मोजणीला गती देण्यासाठी या कामी खासगी व्यक्तींची नेमणूक केली जात असून, पुढील वर्षापर्यंत पैसे भरल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत जमीन मोजणी पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सात कोटी लोकांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असून, प्रत्येक घराचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून मालकाला स्वामित्व सनद दिली जाणार आहे.

    महाराष्ट्र हे सहकाराचे माहेरघर असून, येथून सुरू झालेली चळवळ पुढे देशाने स्वीकारली. मात्र, पुढे सहकाराचा वाईट काळ सुरू झाला. काही राजकीय नेत्यांनी त्याला राजकारणाचा अड्डा बनवले व सहकारी संस्था उद्ध्वस्त केल्या. राज्यातील आठ जिल्हा बँका बुडाल्या. नागपूर जिल्हा बँकेचे चौदाशे कोटी रुपये थकीत आहेत. मात्र, आता केंद्र व राज्य सरकारकडून सहकार क्षेत्राला बळ दिले जात आहे, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

    Maharashtra TimesNashik Unseasonal Rain: ‘अवकाळी’ने बिघडवले अर्थचक्र! बळीराजाला पावसाचा पुन्हा तडाखा, 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त
    खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार राहुल ढिकले, मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार, गोदावरी बँकेचे उपाध्यक्ष वसंत खैरनार, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, सुरेश पाटील, दत्तात्रय पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी प्रास्ताविक केले. अनिल भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा