अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत शड्डू ठोकल्याने आता बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असाही सामना पाहता येणार आहे. यावर आता जय पवारांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Baramati By Election: बारामतीत काँग्रेस उमेदवार उतरवणार, जय पवारांची प्रतिक्रिया काय?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अजितदादांच्या निधनानंतर जी बिनविरोधची चर्चा रंगली होती, त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. सहानभूतीची लाट असूनही काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याचा मोठा निर्णय घेतल्याने, बारामतीत आता थेट राजकीय ‘दंगल’ पाहायला मिळणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, सुरुवातीला व्यक्त होत असलेली बिनविरोध निवडणुकीची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने बारामतीत आता थेट राजकीय सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सर्वत्र या निवडणुकीची चर्चा होते आहे.
काँग्रेस देणार उमेदवार
काँग्रेस पक्षाने या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील चुरस आता प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघणार असून, सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.
जय पवारांच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पवार साहेबांसह सर्वांचीच इच्छा ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी होती. मात्र लोकशाही प्रक्रियेनुसार कोणताही पक्ष निवडणूक लढवू शकतो.” त्यांनी पुढे सांगितले की, पक्ष कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे आणि मतदारांपर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका स्पष्ट करावी.
या निवडणुकीकडे केवळ बारामतीच नव्हे, तर राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयामुळे या निवडणुकीत प्रतिष्ठेची लढत होणार आहे.
रंगतदार होणार निवडणूक
एकीकडे सहानुभूतीची लाट, तर दुसरीकडे विरोधकांचा निर्धार, अशा दुहेरी पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात प्रचाराला वेग येणार असून, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा