नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत तिसरीत शिकणाऱ्या ८ वर्षीय ब्रायन गावीतचा उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप होत असून, वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे नवापूर परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आश्रमशाळेत राहणारा चिमुकला होता बेपत्ता, सेफ्टी टँकमध्ये आढळली बॉडी, आई-वडिलांचा आक्रोश, घातपाताचा संशय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नंदुरबार , महेश पाटील: नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत घडलेली एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे झालेल्या गंभीर दुर्लक्षामुळे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या निष्पाप ब्रायन राहुल गावीत (वय ८, रा. सोनखडका, ता. नवापूर) या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शाळेच्या वसतीगृहाच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून ब्रायनचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, ही टाकी उघडीच असल्याने लहान मुलांच्या जीवाशी थेट खेळ सुरू होता, मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रायन शुक्रवारपासून बेपत्ता होता. त्याच्या बेपत्तेपणाची तक्रार नवापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. पोलीस, शिक्षक आणि पालक त्याचा शोध घेत असताना शनिवारी दुपारी शाळेच्या परिसरातील उघड्या सेफ्टी टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली.घटनास्थळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह पोलीस पथक, तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकानेही तपास सुरू केला आहे. मृतदेह बाहेर काढून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
Accident News : कार आली, धडक दिली अन् महिला हवेत उडाली; मुलीचा आक्रोश, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा CCTV समोर
वडिलांचा घातपाताचा संशय
मात्र, आपल्या लेकराचा मृतदेह पाहताच आई-वडिलांनी व नातेवाईकांनी केलेला आक्रोश अंगावर काटा आणणारा होता. या वेदनादायक प्रसंगाने संपूर्ण परिसर सुन्न झाला. दरम्यान, ब्रायनच्या वडिलांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्याने घटनेला वेगळे वळण लागले आहे. घटनेनंतर आश्रम शाळा परिसरात तणाव निर्माण झाला असून, बंदोबस्तासाठी आरसीपी दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. संतप्त पालकांनी शाळा प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिस तपास सुरु
लहान मुलं खेळत असलेल्या परिसरात इतका मोठा धोका उघड्यावर ठेवला जातो, ही केवळ चूक नसून गुन्हाच असल्याची भावना व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाबद्दल आदिवासी विकास विभाग काय कारवाई करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ब्रायनचा मृत्यू नेमका अपघात आहे की घातपात, याचा तपास पोलीस करत असून, या घटनेमुळे शासकीय आश्रम शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा