अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले.राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.या प्रकरणात काही निवडक नेत्यांचीच नावे पुढे येत असून, अँटी-सीएम यादीतून समोर येत आहेत असं अंधारे म्हणाले.ज्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संबंध नाही, त्यांच्याच सीडीआर समोर येत आहेत असं अंधारे म्हणाले.मात्र जयकुमार रावल किंवा गिरीश महाजन यांची माहिती का समोर येत नाही? असा सवाल अंधारेंनी केला.एसआयटी तपासात फक्त निवडक माहितीच बाहेर आणली जात आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला