• Mon. Aug 10th, 2026

    विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच मंजुरी –उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 9, 2026

    कोल्हापूर, दि. ९ : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल समितीने शासनाकडे सादर केलेल्या १९५ कोटी रुपयांच्या आराखड्यास लवकरच मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

    विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल समितीने शासनाकडे सादर केलेल्या आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर क्रीडा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील उपस्थित होते.

    यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विभागीय क्रीडा संकुल समितीने शासनाकडे सादर केलेल्या १९५ कोटी रुपयांच्या आराखड्याची माहिती घेतली. कोल्हापूरच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी केली असून, त्यांना अद्ययावत सुविधांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे हा आराखडा मंजूर करण्यासाठी राज्य क्रीडा विकास समितीमार्फत प्रस्तावाच्या मंजुरीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed