सातारा जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ बघायला मिळाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादीच्या दोन फुटीर सदस्यांना सभापतीपद देण्यात आलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसारखाच ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ शनिवारी विषय समित्यांच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला. भाजपकडून झालेली फोडाफोडी आणि पोलिसांनी केलेल्या दंडकाईच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे सर्व निवडी बिनविरोध झाल्या. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन फुटीर महिला सदस्यांना सभापतिपदाची संधी मिळाली.
विषय समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व सदस्यांना तीन दिवसांपासून कास पठार परिसरातील एका रिसॉर्टमध्ये ठेवले होते. तिथून सकाळी साताऱ्यातील फर्न हॉटेलमध्ये आल्यानंतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर एका लक्झरी बसमधून सर्व सदस्यांना जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आले. पोलिसांनी त्यांना जिल्हा परिषदेत सहज प्रवेश दिला. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांची ओळख परेड घेत सभागृहात वेळेत जाऊ दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तसेच दंडावर काळ्या फिती बांधून निषेध करत पोलिसांनी लोकशाहीची पुन्हा हत्या केल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्यांना सभापतीपद
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत झालेला राडा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर आज विषय समित्यांच्या निवडणुकीत देखील त्याचीच झलक दिसली. भाजपने तीन दिवस आपले सदस्य पर्यटनस्थळी ठेवले होते. तसेच वाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य ऋतुजा शिंदे यांना फोडण्यात भाजपने यश मिळवले. तसेच त्यांना सभापती पद देखील दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत भाजपला मतदान करणारे कामेश कांबळे यावेळी गैरहजर होते.
शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक
भाजपने आपला सदस्य फोडल्याने आणि सभागृहात जाताना पोलिसांनी अडवणूक केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले. दंडावर काळ्या फिती बांधून जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर बसत त्यांनी भाजपसह पोलीस प्रशासनाचा निषेध केला. तसेच फुटीर महिला सदस्याच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.
सभापतींची बिनविरोध निवड
दरम्यान, विरोधक सभागृहात उपस्थित न राहिल्याने भाजपचे ऋषीकेश धायगुडे, तेजस्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर सदस्या लता कर्णे आणि ऋतुजा शिंदे यांची विषय समित्यांच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
सातारा जिल्हा परिषद समिती सभापतींच्या निवडणुकीवर शिवसेना-राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि अपक्ष सदस्यांनी बहिष्कार टाकल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाईं म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच यशवंत विचारांच्या सातारा जिल्ह्यात सदस्यांवर काळ्या फिती लावून पायऱ्यांवर बसण्याची वेळ आली. २० मार्च रोजी प्रशासन ज्या पद्धतीने वागलं त्याविरोधात संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले. त्या भाजपच्या विरोधात आम्हाला निवडणूक लढवायची नाही, अशा भावना शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी व्यक्त केल्या. तसेच आमच्या सदस्यांनी २० मार्च रोजीच्या घटनेबद्दल सभागृहात तीव्र निषेध केल्याचे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा