Oman Boat Tragedy : ‘घटनेला जवळपास एक महिना उलटूनही दीक्षितचे पार्थिव मिळालेले नाही आणि अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत,’ असे म्हणत याविषयी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी सोलकी कुटुंबीयांनी याचिकेद्वारे केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीत ४ मार्च रोजी ओमानच्या समुद्रकिनारी ‘एमटी एमकेडी व्योम’ या तेलवाहू जहाजावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला २५ वर्षीय भारतीय खलाशी दीक्षित सोलंकी, याच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘घटनेला जवळपास एक महिना उलटूनही त्याचे पार्थिव मिळालेले नाही आणि अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत,’ असे म्हणत याविषयी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी कुटुंबीयांनी याचिकेद्वारे केली आहे.
सोलंकी कुटुंबाची कोर्टात धाव
या याचिकेवर सोमवारी, ६ एप्रिल रोजी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दीक्षितचे वडील अमृतलाल सोलंकी व बहीण मिताली सोलंकी यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर व ॲड. माधवी अयप्पन यांच्यामार्फत ही रिट याचिका केली आहे. ही याचिका परराष्ट्र मंत्रालय, तसेच बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालय, ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग’ आणि ‘व्ही शिप्स इंडिया प्रा. लि.’ (जे ‘एमटी एमकेडी व्योम’ जहाजाचे व्यवस्थापन करते) यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे. Ashok Kharat : जावईबापू कपडे काढा, लग्नाची हळद लावायचीय! अशोक खरात ऐकत नव्हता, सासुरवाडीतील किस्सा, वस्त्र उतरवताच दिसलेलं पाप
कुटुंबीयांचं म्हणणं काय?
‘मानवी सन्मानाचा मूलभूत अधिकार हा मृत्यूनंतरही लागू असतो. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्याचे पार्थिव मिळण्याचा आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्याचा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मूलभूत अधिकार आहे. शिवाय समुद्री नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार समुद्रात मृत्यू झाल्यास योग्य पद्धतीने बॉडीची हाताळणी करणे आणि तो कुटुंबीयांच्या ताब्यात देणे बंधनकारक आहे. त्यामुळे शव कुटुंबीयांकडे वेळेत सुपूर्द करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. मात्र, घटनेला जवळपास एक महिना उलटूनही दीक्षितचं पार्थिव आम्हाला मिळालेलं नाही. आम्ही अनेक ठिकाणी धावपळ करत संपर्क साधला. मात्र, संबंधित अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे आणि आम्हाला कोणतीच स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.’ असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
Kharat case | खरातचा नवा कारनामा, शेतकऱ्यांनाही सोडलं नाही, लाखोंची जमीन कवडी मोलात खरेदी
Crime News : 18 वर्षांच्या युवतीने जीव दिला, 27 वर्षांच्या नातेवाईकानेही काही मिनिटातच आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ ‘अधिकाऱ्यांनी बॉडी सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही. शिवाय घटनेनंतर जहाजाच्या मालक कंपनीला अनेक ई-मेल पाठवूनही स्पष्ट माहिती मिळाली नाही. कंपनीकडून फक्त शव शोधून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उत्तर वारंवार देण्यात आले’, असे गाऱ्हाणे कुटुंबीयांनी याचिकेत मांडले आहे. तसेच ‘पार्थिव आमच्या ताब्यात देण्यासह तपास व फॉरेन्सिकविषयीची सर्व माहिती आम्हाला देण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत’, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा