• Sun. Jun 14th, 2026
    Anjali Damania: रुपाली चाकणकरांचे खरातला 177 कॉल्स; अंजली दमानियांचा दावा, बड्या मंत्र्यांची घेतली नावं!

    Anjali Damania On Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला वर्षभरात 177 फोन कॉल केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला.

    रुपाली चाकणकरांचे खरातला १७७ फोन कॉल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी वर्षभरात १७७ फोन कॉल केल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी केला. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खरातशी १७ वेळा फोनवरून संपर्क साधल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

    अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमातून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मागील वर्षभरातील कथित कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे त्यांनी कोणते राजकीय नेते अशोक खरातच्या संपर्कात होते आणि त्यांनी किती वेळा खरातला कॉल केले, याची माहिती असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. चाकणकर यांच्या बहिणीनेही अशोक खरातला तब्बल २३६ वेळा कॉल केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    Maharashtra TimesAcid Attack: मालाडमध्ये 600 रुपयांच्या वादातून अंगावर फेकलं ॲसिड; 7 ते 8 जण होरपळले
    आपल्याला एका अनोळखी व्यक्तीकडून अशोक खरातचा सीडीआर प्राप्त झाला. या रेकॉर्डमध्ये अनेक राजकीय नेत्यांशी झालेल्या संवादाचा तपशील असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. त्यांच्या दाव्यानुसार चाकणकर यांनी वर्षभरात अशोक खरातला तब्बल १७७ वेळा कॉल केले. या दोघांमध्ये एकूण सुमारे ९ तास ३६ मिनिटे संभाषण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिलासुद्धा चाकणकर यांनी कॉल केल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

    Shashikant Shinde | शरद पवार वयाच्या ८५ व्या वर्षी दौरा करणार? शिंदें स्पष्टच बोलले

    अन्य नेत्यांचीही नावे
    या प्रकरणात दमानिया यांनी अनेक इतर राजकीय नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे यांनी १७ वेळा, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्येकी आठवेळा, मंत्री आशीष शेलार यांनी एकदा अशोक खरातशी संपर्क साधला आहे. दमानिया यांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांचेही यात नाव घेतले आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा